जिल्ह्यात स्वच्छ माझे अंगण अभियान चळवळ:गावांमध्ये होणार स्वच्छ कुटुंबाचा सन्मान, प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार
2 hours ago
2
शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या संकल्पनेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील गाव स्तरावरील सर्व कुटुंब स्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन स्वच्छतेची सवय अंगीकृत करण्यासाठी व या मधून लोक चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने गाव स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार स्वच्छ माझे अंगण अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये गावातील कुटुंबांचा सन्मान करण्यात येणार आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’ ग्रामीण टप्पा २ अंतर्गत जिल्ह्यात ज्या कुटुंबानी वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा, परसबाग, पाझर खड्डा, घनकचरा व्यवस्थापना करिता कंपोस्ट खत खड्डा अथवा घरगुती खत खड्डा तसेच कुटुंब स्तरावर कचराकुंड्या या बाबतची उपलब्धता करून घेतली. अशा कुटुंबांना प्रोत्साहन देत इतरही कुटुंबांनी त्यांचे अनुकरण करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे. देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कुटुंबाने पुढाकार घेणे, घरगुती स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण करणे, कुटुंब स्तरावर सुका कचरा, ओला कचरा कुंड्यांमध्ये वर्गीकरण करणे, वर्गीकरण केलेल्या घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खत खड्डा किंवा घरगुती खतखड्डा निर्मिती करून कचऱ्याचे, घर किंवा घराच्या परिसरात व्यवस्थापण करणे, परसबाग, पाझर खड्डा, शोष खड्डा या द्वारे घरगुती स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन करणे या बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे. कुटुंब निवडीचे निकष संबधित कुटुंबाकडे घरात अथवा परीसरात खालील बाबी असणे आवश्यक आहे. यामध्ये घरगुती खतखड्डा, परसबाग, वैयक्तिक शोषखड्डा, पाझर खड्डा, वैयक्तिक शौचालय, घरगुती कचराकुंड्या इत्यादी.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)