जिल्ह्यात ७२ टक्के मतदान

1 day ago 1

कणकवली ः शहरातील एका केंद्रावर मतदानासाठी झालेली गर्दी. (छाया ः अनिकेत उचले)

पुढारी वृत्तसेवा

Published on

21 Nov 2024, 12:15 am

Updated on

21 Nov 2024, 12:15 am

ओरोस : जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या तीनही विधानसभा मतदारसंघांतील एकूण 17 उमेदवारांचे राजकीय भवितव्य बुधवारी मतदानयंत्रांत बंद झाले. यासाठी शांततापूर्ण वातावरणात उत्स्फूर्तपणे सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 72 टक्के मतदान झाले.

बांदा-सटमटवाडी येथील मतदारांनी काही तास मतदानावर बहिष्कार घालण्याचा प्रकार वगळता जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, नेहमीप्रमाणे मतदार याद्यांच्या घोळाचे प्रकार प्रत्येक मतदान केंद्रांवर दिसून येत होते. सर्वच मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. गेल्या विधानसभेपेक्षा यावेळी वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाच्या फायद्याची ठरणार, हे आता शनिवारी, 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.(Maharashtra assembly poll)

राज्यात विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात बुधवारी पार पडल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघांत सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांनी घराबाहेर पडत उत्स्फूर्तपणे मतदान केले. जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवर पहिल्या टप्प्यात मशिन बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या; परंतु त्या तत्काळ मशीन दुरुस्त करून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.

कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विद्यमान आ. नितेश राणे यांनी वरवडे-फणसवाडी तर महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी कणकवली शहरातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राजन तेली, विशाल परब, अर्चना घारे-परब या उमेदवारांनी आपआपल्या भागातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तर कुडाळ मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आ. वैभव नाईक यांनी कणकवली शहरातील मतदान केंद्रावर तर महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी कणकवली वरवडे-फणसवाडी मतदान केेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.(Maharashtra assembly poll)

दुपारच्या सत्रात मतदारांचा मतदानासाठी काहीसा कमी प्रतिसाद होता परंतु दुपारी 3 वा. नंतर पुन्हा सर्वच मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा आणि गर्दी दिसत होती.

सरासरी मतदानाची टक्केवारी

जिल्ह्यात सकाळी 7 ते दुपारी 11 या वेळेपर्यंत एकूण 23.2 टकक्के एवढे मतदान झाले आहे. यामध्ये सर्वात अधिक कुडाळ विधानसभा मतदारसंघात 25. 47 टक्के ,कणकवली मतदारसंघात 21.22 टक्के तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 22.53 टक्के एवढे मतदान झाले आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 42.21 टक्के एवढे मतदान झाले. यामध्ये सर्वात अधिक कणकवली विधानसभा मतदारसंघात 45.11 टक्के, कुडाळ मतदारसंघात 42.26 टक्के तर सावंतवाडी मतदारसंघात 39.24 टक्के एवढे मतदान झाले आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत 55.31 टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वात अधिक कणकवली विधानसभा मतदारसंघात 57.03 टक्के ,कुडाळ 55. 99 टक्के तर सावंतवाडी मतदारसंघात 52.95टक्के मतदान झाले.सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात 67 .60 टक्के मतदान झाले होते. यामध्ये सर्वात अधिक कणकवली विधानसभा मतदारसंघात 67.46 टक्के ,कुडाळ मतदारसंघात 68.85टक्के तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 66. 56 टक्के एवढे मतदान झाले. यासाठी जिल्ह्यात एकूण 4 लाख 58 हजार 955ऐवढ्या मतदारांनी20मछजतमडळपवर्हीमझरसशम01 मतदानाचा अधिकार बजावला.यामध्ये एकूण पुरूष 2,34,308 तर 2,24,647 महिला मतदारांचा समावेश आहे.अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.

टक्का वाढला; पण यादीतील घोळ कायम

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे, गोवा व अन्य राज्यांत स्थायिक झालेले जिल्ह्यातील मतदार मतदानासाठी आपआपल्या गावी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यामुळे 2019 च्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांपासूनचा मतदार याद्यांमधील घोळ या निवडणुकीतही दिसून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article