जीवघेणा अपघात घडल्यावर रस्ते दुरुस्त करणार का, नागरिकांचा सवाल‎:पंचवटी चौकापासून आरटीओपर्यंत सव्वा कि. मी. रस्त्यावर 20 फूट लांबीचे खड्डे

2 hours ago 1
शहरातील बहुतेक मुख्य कार्यालयांना पंचवटी चौकापासून आरटीओपर्यंत जोडणारा अत्यंत महत्त्वाचा सव्वा कि. मी. लांबीचा रस्ताच ‘खड्ड्यात’ गेल्याने येथे वाहनांचे लहान-मोठे अपघात होत असून, वाहन चालकांसाठी धोकादायक असल्याचे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर दिसून आले. या रस्त्याची अक्षरश: खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. जिल्हा उद्योग केंद्राजवळ तर २० फूट लांबीचा व १७ फूट रुंदीचा तसेच ५ इंच खोल, तसेच आरटीओजवळ १६ फूट लांबीचा, १२ फूट रुंदीचा व ४ इंच खोल असे दोन मोठे खड्डे वाहन चालकांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचा अनुभव या रस्त्याने जाताना आला. अशा धोकादायक रस्त्याकडे मनपा, जिल्हा प्रशासन व पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यावर जीवघेणा अपघात घडल्यानंतरच त्याची दुरुस्ती करणार का, अशा शब्दांत वाहन चालक संताप व्यक्त करत आहेत. २०१७ मध्ये पूर्णपणे डांबरीकरण केलेल्या या मार्गावर शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, {उर्वरित. पान ४ ^शिकवणी वर्गाला याच मार्गाने जावे लागते. पहाटे तसेच रात्री या मार्गावर बहुतेक वेळा लाईट बंद असतात. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. त्यातून वाहन उसळून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच खड्ड्यातून वाहन उसळल्याने माझ्या मैत्रिणीचा अपघात झाला. -तृप्ती हिवराळे, विद्यार्थिनी. जिल्हा उद्योग केंद्र खड्ड्यामुळे दुचाकी स्लिप ^पंधरा दिवसांपूर्वी काही कामानिमित्त विद्यापीठाकडे जात होतो. दरम्यान जिल्हा उद्योग केंद्राजवळील खड्ड्यात दुचाकी उसळली. ती अनियंत्रित होऊन मी खाली पडलो. हाताला व छातीला दुखापत झाली. खड्डे बुजवावेत. प्रशांत सरदार, नागरिक जिल्हा उद्योग केंद्रानजीक पडलेला जीवघेणा खड्डा. आरटीओ कार्यालय मार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे. एसटी विभागीय कार्यालय परिसरातील रस्त्याची झालेली दुरवस्था. एसटी विभागीय कार्यालय परिसर पाठ, मान, कंबरेच्या तक्रारी ^आरटीओ व जिल्हा उद्योग केंद्राजवळील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. बाकी उर्वरित रस्त्यावर खड्ड्यांबाबत विचारूच नका. खड्ड्यातून वाहन उसळत असल्याने दुरुस्तीचा खर्च वाढला असून पाठ, मान, कंबरेच्या तक्रारी डोके वर काढत आहेत. -दिवाकर चिखलकर, ज्येष्ठ नागरिक. प्रशासनाने दखल घ्यावी ^या मार्गाने रात्रीच्या सुमारास वाळू, गिट्टीची वाहतूक करणाऱ्या मोठ्या ट्रकची सतत ये-जा सुरू असते. डागडुजी करूनही फायदा होत नाही. या मार्गावर जड वाहनांमुळे धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या रस्त्याची दखल घ्यावी. -किशोरआनंद देशमुख, नागरिक. रस्ता खड्डेमय, पथदिवे बंद

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article