‘डर’, ‘इश्क’, ‘कयामत से कयामत तक’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘आईना’, ‘भुतनाथ’ यांसारख्या अनेक सिनेमांत महत्त्वाची भूमिका बजावत अभिनेत्री जुही चावला हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. 90 च्या दशकात सर्वत्र फक्त आणि फक्त जुही चावला हिचा बोलबाला होता. चाहत्यांमध्ये सर्वत्र जुहीची क्रेझ होती. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांसारख्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर करत अभिनेत्रीने बॉलिवूडला अनेक हीट सिनेमे दिले. एक काळ असा देखील होता जेव्हा अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते जुही हिच्यासोबत काम करण्यासाठी रांगेत असायचे…
जुही हिने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. पण करीयरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने उद्योजक जय मेहता यांच्यासोबत लग्न केलं. जय मेहता यांच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने कित्येक दिवस लग्न झाल्याची अधिकृत घोषणा केलेली नव्हती. अनेक वर्षांनंतर खुद्द अभिनेत्री यामागचं कारण सांगितलं होतं. आता जुही हिच्या लग्नाचा 30 वर्ष जुना फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जुही चावलाने का लपवलं स्वतःचं लग्न?
जुही चावलाने एका मुलाखतीत सांगितले, जेव्हा तिने जय मेहता यांच्यासोबत लग्न केलं तेव्हा ती बॉलिवूडमध्ये करिअरच्या शिखरावर होती. जुहीचे अनेक सिनेमे हिट होत होते. अशा परिस्थितीत लग्नाचं प्रकरण समोर आलं तर आपल्या करिअरला हानी पोहोचू शकते, अशी भीती अभिनेत्रीला वाटत होती.
मुलाखतीत जुही म्हणाली होती, ‘तेव्हा इंटरनेट नव्हतं आणि फोनमध्ये कॅमेरा देखील नव्हते. त्यामुळे लग्न गुपित ठेवणं फार कठीण नव्हतं. त्यामुळे मला देखील वाटलं खासगी गोष्ट समोर न येता करीयरकडे लक्ष केंद्रीत करावं…’ सध्या जुहीच्या लग्नाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.
जुही चावला हिचं लग्न
जुही चावला हिने 1995 मध्ये जय मेहता यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या काही दिवस आधी जुही चावला हिच्या आईचं निधन झालं होतं. म्हणून घरातच कुटुंबियांच्या उपस्थित जुही चावला आणि जय मेहता यांचं लग्न झालं. लग्नानंतर जुही हिने मुलगी जान्हवी आणि मुलगा अर्जुन यांना जन्म दिला. आता जुही बॉलिवूडमध्ये सक्रिय नसून आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे.