ज्ञानेश्वर देवस्थान अध्यक्षपदावरुन अभंग यांच्या हकालपट्टीची मागणी:संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळास निवेदन

15 hours ago 2
निवडणूक प्रचारादरम्यान एका प्रचारसभेत माजी आ. पांडुरंग अभंग यांनी हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी नेवाशातील सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. अभंग यांच्याविरोधात मोर्चा काढून संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळास निवेदन देण्यात आले. त्यात संत ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्षपदावरून अभंग यांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अभंग यांनी एका प्रचार सभेदरम्यान भाषण करताना ‘बाबरी मशीद मनुवाद्यांनी पाडली’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. सोशल मीडियावर अभंग यांचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. अभंग यांची संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी दुपारी शहरातील श्री खोलेश्वर गणपती मंदिर ते संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर असा मोर्चा काढून समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानाचे विश्वस्त भिकाजी जंगले, रामभाऊ जगताप, कृष्णा पिसोटे, माऊली शिंदे, कैलास जाधव, जनसंपर्क अधिकारी भैय्या कावरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रति धर्मदाय आयुक्तांना पाठवल्या असून, त्यात देवस्थानसंदर्भात अनेक मागण्या मांडल्या आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article