Published on
:
16 Nov 2024, 11:48 pm
Updated on
:
16 Nov 2024, 11:48 pm
पंढरपूर : पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस यांच्यामध्ये विचारांचे हेवेदावे मागेपुढे झाले आहेत. यामध्ये मतदारांना संभ्रम होऊ नये म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी उमेदवार असल्याचा खुलासा केलेला आहे. आता आपला विरोधक फक्त आणि फक्त भाजप आहे आणि विद्यमान आमदार आहेत. गतवेळी मतदारांनी त्यांच्यावरती विश्वास ठेऊन त्यांना मतदान केले, पण त्यांनी काय केले? जेवढा निधी आणला त्याच पद्धतीचा विकास झाला नाही, हे माझ्यापेक्षा आपल्या लोकांना अधिक चांगले माहिती असल्याचे प्रतिपादन उमेदवार अनिल सावंत यांनी केले.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांची कोर्टी या गावांमध्ये प्रचार सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना अनिल सावंत म्हणाले की, ज्याप्रमाणे त्यांनी पक्षातील लोकांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकार्यांना जसे वर्यावरती सोडले तसे मी तुम्हाला वार्यावरती कधीही सोडणार नाही. आपले सहकारी मत मागत आहेत. फक्त आणि फक्त वडिलांच्या कृपाशीर्वादामुळे जनता तुम्हाला फिरकू देत आहे. या मतदारसंघामध्ये ज्यांचे काम नाही, अशा व्यक्तीवरती कोण विश्वास ठेवणार.
पण आपण एक सहकारी पक्षाचे लोक आहोत. येणार्या काळामध्ये त्याची मदत आपल्यालाच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची काय काम नाही. येणार्या काळात मतदारसंघामध्ये चांगले हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस, बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी कंपन्या, रस्ते, शेतकर्यांसाठी पाणी, शहरामध्ये असलेल्या गटारींची असुविधा या सर्व समस्यांवरती काम करण्याची एक संधी मला द्या. त्या संधीचे सोने करुन मी दाखवीन, असे आवाहन सावंत यांनी केले.