ज्यांनी मदत केली त्यांनाच महाजन संपवतात:नाथाभाऊंमुळे गिरीष महाजन राजकारणात जन्माला आला- एकनाथ खडसे

2 hours ago 2
ज्यांनी मंत्री गिरीष महाजन यांना मदत केली, त्यांनाच ते संपवण्याची भाषा करतात, अशी टीका जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. जामनेर मतदारसंघातील भाजप नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमावेळी एकनाथ खडसे बोलत होते. दिलीप खोडपे हे मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. जामनेरमधील या प्रवेश सोहळ्यात एकनाथ खडसे यांनी गिरीष महाजन यांच्या जोरदार टीकास्त्र सोडले. एकनाथ खडसे म्हणाले ही, या नाथाभाऊंमुळे गिरीष महाजन राजकारणात जन्माला आला, याचा विसर त्यांना पडला आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा होता. पुढे हा मतदारसंघ भाजपने घेतला. आणि शिवसेनेला भुसावळचा मतदारसंघ देण्यात आला. त्यातून गिरीष महाजन यांचा राजकीय जन्म झाला. ...पण हे महाशय करामती निघाले एकनाथ खडसे म्हणाले ही, निवृत्त शिक्षकाचा मुलगा असल्यामुळे गिरीष महाजन यांच्या थोडेफार संस्कार असतील, असे आम्हाला वाटले होते. पण हे तर फारच करामती निघाले. जिथे जातील, तिथे ते दूध काढतात. ते काय काय करतात हे संपूर्ण राज्याला माहीत झाले आहे. महाजन गंभीर समस्यांवर बोलत नाहीत खडसे म्हणाले की, जळगाव-छत्रपती संभाजीनगर मार्गावर रोज अपघात होऊन लोकांचे मृत्यू होत आहेत. मात्र या गंभीर समस्यांवर महाजन बोलत नाहीत. राज्याचे ग्रामविकास मंत्री असून देखाील जामनेर पंचायत समितीची मुतारी देखील कुलूप बंद केली आहे. जी व्यक्ती मुतारीची व्यवस्था करू शकत नाही, ती मतदारसंघाचा काय विकास करेल? खडसेंचे जनतेला आवाहन खडसे म्हणाले ही, यावर्षीची निवडणूक धनशक्ती विरूद्ध जनशक्ती अशी आहे. मागील सहा टर्म तुमच्या डोक्यावर बसलेल्या आणि सत्तेचा माज चढलेल्या व्यक्तीला घरी बसवण्याची ही संधी आहे. ती आपण सोडू नये. असे आवाहन खडसे यांनी जनतेला केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article