झोपताना मोबाईल शरीरापासून किती दूर ठेवावा?

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

25 Nov 2024, 2:05 am

Updated on

25 Nov 2024, 2:05 am

बेलारुस : मोबाईल हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा असा एक भाग बनला आहे की, सर्वत्र तो आपल्यासोबतच असतो. मोबाईलची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, खाताना, पिताना, येताना, उठता-बसता आपली नजर सतत मोबाईलवरच असते. झोपेत असतानाही काही लोक मोबाईलला सोडू इच्छित नाहीत. याला खरंतर मोबाईलचे व्यसन म्हणतात. जर आपल्यालाही असेच मोबाईलचे व्यसन लागले असेल, तर आता सावध होण्याची वेळ आली आहे. जे लोक झोपताना उशीखाली मोबाईल ठेवतात त्यांनी तर आताच सावध व्हा; अन्यथा अशा सवयीचे अनेक मोठे तोटे आहेत.

आता असा प्रश्न निर्माण होतो की झोपताना मोबाईल स्वतःपासून किती दूर ठेवावा? झोपताना मोबाईल जवळ ठेवला तर काय नुकसान होऊ शकते याची कल्पना बहुतेकांना नसते. डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने देखील या संदर्भात इशारा दिला आहे. एका रिसर्चने आपल्या अहवालात म्हटले आहे की, 68 टक्के प्रौढ आणि 90 टक्के किशोरवयीन मुले त्यांच्यासोबत मोबाईल फोन घेऊन झोपतात.

झोपताना शरीरापासून मोबाईल किती दूर ठेवावा, याबद्दल या संघटनेने मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. ज्यानुसार मोबाईल आपल्यापासून किमान 5 ते 7 फूट दूर असणे आवश्यक आहे. मोबाईलचे रेडिएशन गंभीर आजाराला निमंत्रण देऊ शकते. शिवाय, अगदी जीवघेणे रोगदेखील होऊ शकतात. या संदर्भात कोणतेही लेखी मानक किंवा मापदंड नसले तरी मोबाईलमधून निघणारे रेडिएशन टाळण्यासाठी झोपताना ते स्वतःपासून दूर ठेवणे चांगले. आपण ज्या खोलीत झोप घेतो, तेथे मोबाईल न ठेवल्यास उत्तम आहे, असेही यात सांगितले गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article