Ajit Pawar connected Maharashtra CM : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होत आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार काय म्हणाले? वाचा सविस्तर...
अजित पवार, नेते, राष्ट्रवादीImage Credit source: tv9 marathi
आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 111 स्मृतिदिन आहे. या दिवसानिमित्त अजित पवार सध्या कराडमध्ये आहेत. कराडमधील प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी तुमचंही नाव चर्चेत आहे, याबाबत काही निर्णय झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते आम्ही तिन्ही पक्षाचे नेते बसू आणि निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माझी नेता म्हणून निवड झालेली आहे. सर्व अधिकार मला दिले. एकनाथ शिंदे यांची काल नेता म्हणून निवड केली आहे. आता भाजपने नेते निवड कुणाची करायची काय नाही ते ठरवेलं असेल. आम्ही तिघंही नंतर एकत्र बसू. आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू. राज्याला मजबूत, स्थिर सरकार देऊ, असं अजित पवार म्हणाले.