हिंगोली जिल्ह्यातील 47 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त:शहरातील सर्वाधिक 21 उमेदवारांचा समावेश

2 hours ago 1
हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात उमेदवारांनी अनामत रक्कम वाचविण्यासाठी अपेक्षीत मते न मिळविल्यामुळे 47 जणांच्या अनामत रक्कम जप्त झाल्या आहेत. यामध्ये हिंगोली विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 21 उमेदवारांचा समावेश आहे. हिंगोली जिल्हयातील हिंगोली, वसमत व कळमनुरी विधानसभा मतदार संघात निवडणुक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत 9.84 लाख मतदारांपैकी 7.11 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जिल्हयात हिंगोलीत सर्वाधिक 23 उमेदवार निवडणुक रिंगणात होते. त्या पाठोपाठ 19 उमेदवार कळमनुरीत तर वसमत विधानसभेत 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान, वमसत येथे विद्यमान आमदार राजेश नवघरे, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर व गुरु पादेश्‍वर शिवाचार्य महाराज यांच्यात लढत असल्याचे मानले जात होते. तर कळमनुरीत विद्यमान आमदार संतोष बांगर, ठाकरे गटाचे डॉ. संतोष टारफे, वंचित बहुजन आघाडीचे डॉ, दिलीप मस्के, अपक्ष अजित मगर यांच्यात लढत मानली जात होती. तर हिंगोलीत भाजपाचे तान्हाजी मुटकुळे, ठाकरे गटाच्या रुपालीताई गोरेगावकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश थोरात, अपक्ष भाऊराव पाटील गोरेगावकर, डॉ. रमेश शिंदे, रामदास पाटील सुमठाणकर यांच्यात लढत होईल असे मानले जात होते. मात्र मतदारांनी प्रमुख दोन उमेदवारांच्याच पारड्यात मते टाकली. त्यामुळे वसमत व कळमनुरी, हिंगोलीत दुरंगी लढत झाल्याचेच मतमोजणी नंतर पहावयास मिळाले. दरम्यान, मतमोजणी नंतर अनामत रक्कम वाचविण्यासाठी झालेल्या मतांच्या एक षष्ठांश मते आवश्‍यक होती. मात्र तीनही विधानसभा मतदार संघात दोन प्रमुख उमेदवार वगळता इतरांना आवश्‍यक मते मिळविता आली नाहीत. त्यामुळे हिंगोली विधानसभा मतदार संघात आमदार मुटकुळे, ठाकरे गटाच्या रुपालीताई गोरेगावकर वगळता 21 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. कळमनुरीत आमदार संतोष बांगर, ठाकरे गटाचे डॉ. संतोष टारफे वगळता 17 तर वसमत मध्ये आमदार राजेश नवघरे, राष्ट्रवादीचे (शरद पवार) माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर वगळता 9 जणांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article