टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल मंदिरात काकडा आरतीची सांगता:नगर प्रदक्षणेनंतर गोपाल काल्याचेही आयोजन
3 days ago
2
"उठा पांडुरंगा दर्शन द्या सकला | झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा || , असे आर्जव करत पांडुरंग भक्त िवठ्ठल मंदिरातील काकडा आरतीच्या सांगता सोहळ्यात सहभागी झाले. सोमवारी पहाटेच टाळ मृदंगाच्या गजरात भक्त हरिनामात दंग झाले होते. नगर प्रदक्षणेनंतर सांगता झाली. त्यानंतर गोपाल काल्याचेही आयोजन करण्यात आले होते. जुने शहरातील ३२० वर्षे पुरातन वठ्ठल मंदिर संस्थानात कार्तिक मासात १७ ऑक्टोबर रोजी श्रीगणेशा झालेल्या काकड आरतीची १८ नोव्हेंबर रोजी सांगता झाली. सकाळी नगर प्रदक्षिणेपूर्वी श्री विठ्ठल मंदिर हरिनाम सप्ताहाचे ज्येष्ठ सदस्य विकास पाणी, व्यवस्थापक नितीन खोत, चंद्रकांत चाळसे, सुनील खोत, शाम खोत, यशोधन गोडबोले यांनी वारकऱ्यांचा सत्कार केला. त्यानंतर सकाळी १० वाजता सुधाताई तेल्हारकर यांचे कीर्तन झाल्यानंतर गोपाल काल्याचे वितरण करण्यात आले. त्यानंतर या उत्सवाची सांगता करण्यात आली. परिसरातील विठ्ठल चरणी सेवा प्रदान केली. आभार अशोक पाटील भौरदकर, राजू जोशी यांनी मानले. असा होता नित्यक्रम : कोजागरी पौणिमेपासून काकड आरतीला सुरुवात झाली. नियमित सेवेकरी छाया गोविंदराव परचुरे यांनी विठ्ठल व माता रुख्मिणीच्या मूर्तींचे पूजन केले. पहाटेपासूनच काकड आरतीचा मधुर स्वर निनादला. टाळ मृदंगाच्या साक्षीने नित्य काकडामध्ये मंगलाचरण, अभंग, भूपाळी, गौळणी आदींसह गणपतीची, विठ्ठलाची आणि ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज यांची आरती झाली. सत्कार अन् स्वागत... : महिना भर काकडा आरतीत सहभागी झालेल्या भक्तांचा श्री िवठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह व विठ्ठल रूखमाई संस्थांनतर्फे सत्कार करण्यात आला. नगर प्रदक्षणेत गणपती गल्ली, जयहिंद चौक, िशवाजी नगर, िवठ्ठल मंदिर परिसरात नागरिकांनी काकड्यावर पुष्पांचा वर्षाव करून पूजन केले. अनेक ठिकाणी फाटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. शहरातून काढण्यात आली नगर प्रदक्षणा श्री विठ्ठल मंदिरात सोमवारी पहाटे ५ वाजता आरतीला प्रारंभ झाला. त्यानंतर ५.३० वाजता नगर प्रदक्षणेला सुरूवात झाली. प्रदक्षणा काळा मारोती मंदिर, गणपती गल्लीतील जगदंबा माता मंदिर, महालक्ष्मी माता मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, सितला माता मंदिर, श्री दत्त मंदिर, राजेश्वर मंदिर, गजानन महाराज मंदिर, जागृतेश्वर मंदिर, शिवचरण महाराज मंदिर, श्री माणकेश्वर संस्थान, मुकुंद मंदिर, रोकडोबा हनुमान मंदिर व पुन्हा िवठ्ठल मंदिर या मार्गाने निघाली होती. प्रत्येक मंदिरात त्या त्या देवी-देवतांची आरती झाली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)