टिपू सुलतानचा फोटो स्टेटसला ठेवत वादग्रस्त मजुकर प्रसारित:पुण्यात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

5 hours ago 1
एका अज्ञात इन्स्टाग्राम आयडी धारकाने इन्स्टाग्राम आयडीवरुन टिपु सुलतान याचा फाेटाे ठेवून फाेटाेवर आक्षेपार्ह वादग्रस्त मजकुर लिहिल्याने तसेच ताे प्रसारित केल्याने याबाबत सदर इन्स्टाग्राम आयडी धारक याच्यावर हडपसर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हनुमंत शांतीलाल गुंजाळ (वय-30,रा. माळवाडी, हडपसर,पुणे) याने आराेपी विराेधात पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे इन्स्टाग्राम साेशल मिडिया साईटवर पाहणी करत असताना, त्यांना अनाेळखी इन्स्टाग्राम आयडी धारक याने टिपु सुलतान याचा फाेटाे ठेवून त्यावर हिंदु धर्माबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. तसेच हा फाेटाे जाणीवपूर्वक व्हायरल करुन दाेन धर्माचे एकाेप्यास बाधा येईल असे कृत्य करुन हिंदु धर्माच्या धार्मिक श्रध्देचे अपमान करुन हिंदु समाजाच्या भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. याबाबत पाेलीस उपनिरीक्षक एस पार्वे पुढील तपास करत आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागणी काेथरुड परिसरात रहाणाऱ्या एका 41 वर्षीय तरुण व त्याची पत्नी यांना त्यांचे व्हाॅटसअपवर सूरज राजेंद्र पवार (वय-32,रा. जैनापूर, काेल्हापूर) या तरुणाने तक्रारदार यांचे वडीलांसाेबत केलेल्या अश्लील कृत्याचा व्हिडिओ पाठवला. संबंधित व्हिडिओ हा तक्रारदार यांचे नातेवाईक यांना पाठवून देण्याची व साेशल मिडियावर व्हायरल करु बदनामी करण्याची धमकी देत तक्रारदार यांचेकडे पाच लाख रुपये इतक्या रकमेची खंडणीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी तक्रारदार यांनी आराेपी सूरज पवार याचे विराेधात फिर्याद दाखल केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article