भारतीय रेल्वेचे विस्तीर्ण जाळे देशभर पसरलेले आहे. देशाच्या कनेक्टिव्हिटीमध्ये ही महत्त्वाची भूमिका बजावते. भारताच्या विकासाला गती देण्यात भारतीय रेल्वेही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे अनेक जण भारतीय रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. भारतीय रेल्वे हे प्रवासाचे अतिशय सोयीस्कर साधन आहे. तर दररोज कामावर जाताना देखील असंख्य नागरिक रेल्वेने प्रवास करतात. अशातच जेव्हा लोकांना लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो, तेव्हा ट्रेन ही बहुतेक लोकांची पहिली पसंती असते. ट्रेनमध्ये लोकांना अनेक सुविधा देखील मिळतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने अनेक नियम प्रस्थापित केले आहेत. प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी ही नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमांचा प्रवाशांना फायदा होतो.
ज्याप्रमाणे एखाद्या ट्रेनला ठराविक वेळेपेक्षा जास्त उशीर झाल्यास प्रवाशांना परतावा दिला जातो, त्याचप्रमाणे एखाद्या प्रवाशाचे रेल्वेतून प्रवास करताना काही नुकसान झाले आणि त्याला रेल्वे जबाबदार असेल तर त्याची भरपाई देखील प्रवाशाला दिली जाते.
रेल्वेकडून नुकसान भरपाई मिळेल का?
अनेकदा आपण ऐकतो देखील की भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये अपघात होणे. तसेच काही वेळा गाड्या रुळावरून घसरतात, अशामध्ये परिणामी अनेक प्रवाशांना त्यांचे जीव गमवावा लागतो. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वे या प्रवाशांना नुकसान भरपाई देते. पण समजा एखादा सामान्य माणूस ट्रेनमधून प्रवास करताना त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला, म्हणजे आजारपणामुळे किंवा इतर काही आरोग्याच्या समस्येमुळे त्याचा मृत्यू झाला, तरीही त्याला रेल्वेकडून नुकसान भरपाई मिळेल का?
तरच रेल्वेकडून नुकसान भरपाई दिली जाते
तुमच्या देखील मनात हाच विचार येत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की लोकलमधून परावस आकारताना जर काही आरोग्याच्या समस्येने मृत्यू झाल्यास राहिलेय प्रशासनाकडून कोणतीच भरपाई मिळत नाही. जेव्हा प्रवाश्यासोबत रेल्वेकडून काही निष्काळजीपणा झाल्यास, नुकसान झाल्यास किंवा रेल्वेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याकडून चूक झाली तरच रेल्वेकडून नुकसान भरपाई दिली जाते.
एखाद्या प्रवाशाचा नैसर्गिक परिस्थितीमुळे किंवा प्रवाशाच्या स्वतःच्या चुकीमुळे मृत्यू झाला तर त्याला रेल्वे जबाबदार नाही. अशा वेळी मृत्यू झाल्यास रेल्वेकडून कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही.