ठाणे : डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. गोपाळराव पाटील यांना यंदाचा ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार

2 hours ago 1

‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार pudhari news network

पुढारी वृत्तसेवा

Published on

28 Sep 2024, 7:19 am

Updated on

28 Sep 2024, 7:19 am

ठाणे : मराठवाडा जनविकास परिषदेच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’ शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करणारे एमआयटी संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड आणि लातूर येथील छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यसभा सदस्य डॉ. गोपाळराव पाटील यांना जाहीर झाला आहे.

  • गणेश चंदनशिवे, बाळासाहेब गित्ते, अक्षय रासकर मराठवाडा रत्न

  • दोघे पुरस्कारार्थींना मिळालेत अनेक नामांकित पुरस्कार

लोककलेचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, बीड जिल्ह्यातील तालुका गेवराई, कोळगाव या गावची ब्लॉगरचे गाव म्हणून ओळख निर्माण करणारे अक्षय रासकर आणि धाराशिव कळंब येथील मराठवाडा अ‍ॅग्रो शेतकरी कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये डेरी उद्योग उभा करणारे बाळासाहेब गित्ते या कर्तृत्ववान भूमिपुत्रांना ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार 29 सप्टेंबर रोजी ठाण्यामधील गडकरी रंगायतन येथे सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे. यावेळी प्रा. गणेश चंदनशिवे यांच्या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राची लोकपरंपरा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी पर्वणी ठरणार आहे.

मराठवाडा जनविकास परिषद ही संस्था मराठवाडावासीयांसाठी गेली 16 वर्षांपासून काम करत आहे. दरम्यान संस्थेच्या वतीने दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन सोहळा मोठ्या दिमाखामध्ये साजरा केला जात असतो. या सोहळ्यात समाजासाठी आयुष्यभर बहुमूल्य योगदान देणार्‍या मराठवाड्यातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांना मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा भूषण तसेच विशेष कामगिरी करणार्‍यांना मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

दोन दिग्गज, ऋषितुल्य व्यक्तिमत्वाची निवड

यंदा मराठवाडा भूषण पुरस्कारासाठी मराठवाड्यातील दोन दिग्गज आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्वांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी मराठवाडा भूषण पुरस्कार कोविडचे संकट निवारण्यासाठी उल्लेखनीय काम करणारे राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, डॉ. रमण गंगाखेडकर, कुस्तीपटू राहुल आवारे यांना प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मराठवाडावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article