डोंगरगाव पुलमध्ये कयाधू नदीत मराठा तरुणांचे जलसमाधी आंदोलन:पाण्यात घोषणाबाजी, जरांगेंच्या आंदोलनास पाठिंबा

1 hour ago 3
कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पुल येथील कयाधू नदीत बुधवारी ता. 25 सकाळी जलसमाधी आंदोलन करीत तरुणांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाची अद्यापही शासनाने दखल घेतली नसल्याने सकल मराठा समाजातून तिव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांच्या आंदोलनास हिंगोली जिल्ह्यातून पाठिंबा दिला जात आहे. त्यासाठी हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर मागील चार दिवसांपासून तरुणांनी अमरण उपोषण सुरु केले असून काही नागरिकांनी ठिय्या आंदोलन चालविले आहे. या शिवाय हट्टा येथे उपोषण सुरु आहे तर वसमत तालुक्यातील सकल मराठा समाजातील नागरिकांनी पुकारलेल्या बंदला वसमत तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता या आंदोलनाची तिव्रता वाढत चालली आहे. कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव येथे कयाधू नदीमध्ये तरुणांनी बुधवारी ता. 25 सकाळपासून जल समाधी आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये डोंगरगाव, येहळेगाव, साळवा, आखाडा बाळापूर, कामठा, येलकी येथील तरुणांचा समावेश आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी या तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी सुरु केली आहे. या ठिकाणी पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर बसवंते, जमादार शिवाजी पवार, मधुकर नागरे, नागोराव बाभळे यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. मागील एक तासापासून हे आंदोलन सुरुच असून अनुचीत प्रकार घडू नये तसेच तरुणांना बाहेर काढण्यासाठी पोहणाऱ्या व्यक्तींना देखील या परिसरात तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article