तळागाळापर्यंत पोहोचून "सर्वांसाठी न्याय' हे ब्रीद सार्थ ठरवा:उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर

4 hours ago 1
संविधानाने नागरिकांना दिलेले दिलेले समान हक्क व अधिकार केवळ संविधानापुरते मर्यादित न राहता शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत. न्यायापासून कुणीही वंचित राहू नये तेव्हा "सर्वांसाठी न्याय' हे ब्रीद सार्थ ठरेल, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले. ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने पातूर तालुक्यातील चान्नी येथे आयोजित शासकीय सेवा व योजना महामेळाव्यात बोलत होते. विविध सेवा व योजनांचे प्रमाणपत्र वितरण बेबी केअर किटचे वितरण पूजा इंगळे, निकिता येनकर, कोमल टाले, कोमल येनकर यांना करण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत शालिग्राम राऊत यांना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, प्रतिभा तायडे यांना निराधार योजना, कमल ताले यांना श्रावणबाळ योजना लाभ वितरित करण्यात आला. तर स्नेहल इंगळे, यश ताले, संकेत मुळे यांना जात प्रमाणपत्र, निरंजन आढाव, संजय बोचरे यांना उत्पन्न प्रमाणपत्र तर मनोज वानखडे यांना अधिवास प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article