तहसील कार्यालयाच्या आवारातून दीड वर्षात वाळूचे 18 ट्रक पळवले:वाळू माफियांवर प्रशासन, पोलिसांचाही वचक नसल्याचा परिणाम

2 hours ago 1
शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने गौण खनिजाची मागणी वाढली आहे. यामुळे रॉयल्टी भरून गौण खनिज महाग मिळत असल्याने वाळू, दगड, मुरूम यांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. या चोरांना आवर घालण्यात महसूल प्रशासन आणि पोलिसांनी गेल्या १८ महिन्यांत जप्त केलेल्या वाहनांपैकी तब्बल १७ वाहने चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जप्त केलेल्या वाहनाच्या चाकांमधील हवा सोडली जाते. ती भरण्यासाठी किमान १५ ते २० मिनिटे लागू शकतात. त्याशिवाय ट्रक नेता येत नाही. गेटच्या बाहेर ट्रक नेण्यासाठी किमान पाऊण ते एक तास लागू शकतो. एवढ्या मोठ्या वेळेत सुरक्षा रक्षक आणि गस्तीवरील पोलिसांना ही चोरी दिसत नाही का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. चोरीत कर्मचाऱ्यांचाच सहभाग सध्या जिल्हाभर मोठ्या प्रमाणात गौण खनिज चोरी सुरू आहे. याला पायबंद घालण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यात पोलिस, महसूल आणि आरटीओच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्याच काही गाड्या नातेवाइकांच्या नावावर असल्याची माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे कारवाई करताना अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी मान्य केले. चोरीच्या प्रकारात विभाग सहभागी असण्याची शक्यता चोरी रोखणे व चोराला शोधणे पोलिसांचे काम आहे. मात्र, ज्याच्या ताब्यात ही वाहने आहेत, त्यांनी त्याचे संरक्षण करणे बंधनकारक आहे. वारंवार वाहने चोरी जात असतील आणि त्यानंतरही त्यावर ठोस उपाययोजना केल्या जात नसतील तर यामध्ये संबंधित विभाग सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. - नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त शस्त्रधारी सुरक्षा रक्षक नेमा गौण खनिज चोरीप्रकरणी जप्त केलेली वाहने तहसील परिसरातून चोरी जाणे हे अत्यंत गंभीर आहे. याबाबत आम्ही परिसरात सीसीटीव्ही व गेटदेखील बसवले. मात्र रात्रीच्या वेळी शस्त्रधारी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे. - रमेश मुनलोड, तहसीलदार नंबर प्लेटला लावतात ग्रीस गौण खनिज तस्करी करणारी वाहने दिवसरात्र रस्त्यावर धावताना दिसतात. मात्र, यांच्यावर कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे, या वाहनावर रजिस्ट्रेशन नंबरच नसतो. एखाद्या वाहनावर नंबर असला तरी त्यावर ग्रीस किवा चिखल फासलेला असतो. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article