ते सध्या काय करतात:2 वेळा आमदार, आता"प्रजापिता'चे साधक, रमलेत अध्यात्मात, माढ्याचे विनायकराव पाटील 1985 ते 1995 मध्ये होते आमदार, 28 वर्षे केले राजकारण

2 hours ago 1
पुढारपणाची नशा एकदा चढली की भल्याभल्यांनाही उतरवता येत नाही. पण सोलापूर जिल्ह्यात असेही काही नेते होऊन गेले की त्यांनी आपला साधेपणा, प्रामाणिकपणाचा आदर्श कधीही सोडलेला नाही. माढ्याचे माजी आमदार विनायकराव पाटील हे त्यापैकीच एक होय. सलग दोन वेळा आमदार राहिले. राजकारणातील नैतिक पातळी खालावतेयं असे वाटल्याने त्यांनी पक्षीय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पुढे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाशी ते जोडले गेले. गेल्या ३० वर्षांपासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेत सहभाग घेऊन ते अध्यात्माच्या मार्गात रमले आहेत. पाटील हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रभावीत होऊन राजकारणात आले . माढा तालुक्यातील सापटणे (भोसे) हे त्यांचे मूळ गाव. सोलापुरातील दयानंद कॉलेजमध्ये बीएच्या शेवटच्या वर्षात शिकत असताना गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. तेव्हा लोकांना वायकरांवांना बिनविरोध सरपंच केले. वयाच्या २३ व्या वर्षी ते सरपंच झाले. १९६७ पासून पुढे दोन टर्म ते सरपंच राहिले. १९७२ ते १९८९ काळातील सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य होते. याच काळात त्यांनी सभापती ही भूषवले. १९८५ मधील विधानसभा निवडणुकीत माढा तालुक्यातील सर्व नेत्यांनी मिळून विनायकराव पाटील यांना अपक्ष म्हणून उभे केले. सर्वांनी साथ दिली. तेव्हा त्यांनी काँग्रेसचे प्रकाश मस्के यांचा पराभव करत निवडून आले. पुढे १९९० मध्ये ते काँग्रेसकडून निवडून आले. १९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार बबनराव शिंदे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर त्यांनी राजकारणापासून संन्यास घेतला. अध्यात्मिक क्षेत्राकडे वळण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही पक्षीय राजकारणात पाऊल ठेवलं नाही. विनायकराव यांचे मित्र डॉ. पावले यांच्या माध्यमातून ते प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाशी जोडले गेले. माऊंट अबू येथे दहा दिवसीय शिबिर केल्यानंतर त्यांच्या जीवनात परिवर्तन झाले, तेथून त्यांना अध्यात्माचा मार्ग गवसलस. तेव्हापासून त्यांनी प्रजापिताच्या सेवेत स्वतला झोकून दिले आहे. लोकांनी पैसे गोळा करुन आमदार केले १९७० ते १९८० च्या दशकातील राजकारण वेगळे होते. १९८५ मध्ये विधानसभेची निवडणूक लागली. माढ्यातील नेते मंडळांनी मला उभा करण्याचा निर्णय घेतला. लोकांनी पैसे गोळा करुन मला अपक्ष म्हणून उभे करत त्या काळाच्या बलाढ्य काँग्रेस पक्षाविरोधात निवडून आणले.लोक चांगल्या माणसाच्या मागे उभे राहत होती. पण आता परिस्थिती वेगळी आहे. राजकारणात खूप बदल झाले. माणसं बदलली. पैशाशिवाय काहीच चालत नाही. आता लोक पैसे मागतात,अशी खंत माजी आमदार पाटील व्यक्त करतात. राजकारणात सत्व, प्रामाणिकपणा राहिला नाही ^पूर्वी राजकारणात नीतीमत्ता, प्रामाणिकपणा याला किंमत होती. पण आता पैशाला किंमत आहे. राजकीय कारकीर्दीत भाई एस.एम. पाटील, धनाजी साठे, प्रकाश मस्के, बबनराव शिंदे यांच्या विरोधात उभे राहीलो. आम्ही कधीही एकमेकांविरोधात खालच्या पातळीवर टीका केली नाही. आता लबाडी करणाऱ्यांचे चालते. त्यामुळे १९९५ पासून राजकारणातून संन्यास घेतला. आणि आध्यामिक क्षेत्रात कार्यरत आहे. याठिकाणी समाधान आहे. विनायकराव पाटील, माजी आमदार माढा

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article