णाला पंतप्रधान, मुख्यमंत्री बनवावं हा आमचा विषय आहे, विरोधकांकडे रडत बसण्याशिवाय दुसरं काम नाही असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला आहे. कसं झालं, क्या से क्या हो गया, असे सगळे डायलॉग आता ते पाठ करत बसतील
संजय शिरसाटImage Credit source: societal media
भाजपाने शिंदेंना केंद्रीय गृहमंत्रीपदाची ऑफर दिली असेल. भविष्यात पंतप्रधानपदाचं आश्वासन दिलं असेल. महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री बनेल यात माझ्या मनात शंका नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते, त्यावर आता शिंदे गटाच्या नेत्यानेच पलटवार करत प्रत्युत्तर दिलं आहे. कोणाला पंतप्रधान, मुख्यमंत्री बनवावं हा आमचा विषय आहे, विरोधकांकडे रडत बसण्याशिवाय दुसरं काम नाही असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला आहे. कसं झालं, क्या से क्या हो गया, असे सगळे डायलॉग आता ते पाठ करत बसतील. करावं तसं भरावं हे आता विरोधकांच्या नशिबी आलंय. आधी बेकायदेशीर सरकार बनवत होते, आता कायदेशीर सरकार कधी स्थापन होणार याची आमच्यापेक्षा त्यांनाच जास्त चिंता लागली आहे.
आम्हाला आमचं सरकार कधी स्थापन करायचं, ते कसं चालवायचं हे आम्ही ठरवू, तुम्ही आता फक्त घोषणा देण्याचं काम करा, असा खोटक सल्लाही संजय शिरसाट यांनी दिला.
ही बातमी अपडेट होत आहे.