थंडी वाढली; आजपासून पारा घसरणार:किमान 14अंश सेल्सियसपर्यंत तापमान जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज
3 days ago
2
मागील दोन दिवसांपासून शहरात थंडीचा जोर वाढला आहे. दिवसभर वातावरणात गारवा जाणवतो आहे. तसेच रात्री गारठा अनुभवायला येत आहे. दरम्यान पुढील दिवसांत तापमान पुन्हा घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. शहर परिसरात चार ते पाच दिवसांपासून कमाल पारा ३१ अंश सेल्सियसपर्यंत तर किमान तापमानात १५ अंशांपर्यंत घट नोंदवण्यात येत आहे. शहरातील किमान तापमान मागील काही दिवसांत १७ ते १६ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. आठवड्यात सोमवारी-मंगळवारी कमाल तापमान ३१ अंश सेल्सियस होते, तर किमान तापमान १६ अंश होते. दरम्यान गुरुवारी १ अंशाने पारा घसरला. गुरुवारी उर्वरित पान ४ तारीख किमान कमाल २२ नोव्हेंबर १५.९ ३१.२ २३ नोव्हेंबर १५.७ ३१.१ २४ नोव्हेंबर १५.३ ३१.४ २५ नोव्हेंबर १५.२ ३१.५ २६ नोव्हेंबर १५.१ ३१.६ असे राहील तापमान
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)