दसरा महोत्सवाच्या गर्दीत हरवलेली मुले सुखरूप पाहून कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू:पोलिस मदत केंद्रामुळे फायदा

5 days ago 3
हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात शनिवारी तारीख 12 तब्बल एक लाखापेक्षा अधिक नागरिकांची गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये हरवलेली सात मुले पोलीस मदत केंद्रामुळे अवघ्या काही वेळातच आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आली मुलांना पाहतात त्यांच्या आई-वडिलांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दसरा महोत्सव आहे. या ठिकाणी कृषी व औद्योगिक प्रदर्शनी सोबतच रामलीला कार्यक्रम नागरिकांचे मुख्य आकर्षण असते. दसरा महोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या पथकाने दसरा महोत्सवात रामलीला मैदानामध्ये तसेच मैदानाच्या बाहेर पोलीस मदत केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. या मदत केंद्रामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. याशिवाय साध्या देशातील आठ पथके दसरा महोत्सवात लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आज दसरा महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या रावण दहन कार्यक्रमासाठी सायंकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली आहे. रात्रीच्या वेळी कृषी व औद्योगिक प्रदर्शनी मध्ये मोठी गर्दी झाली. या ठिकाणी असलेल्या स्टॉलवर खरेदीसाठी महिलांची ही गर्दी आहे. या गर्दीमध्ये सात मुले आई वडिलांचा हात सोडून बाजूला झाली मुले बेपत्ता झाल्याने त्यांच्या आई-वडिलांना चांगलाच घाम फुटला. मात्र दसरा महोत्सवात साध्या वेशात फिरणाऱ्या पोलिसांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलांना सोबत घेऊन पोलीस मदत केंद्र गाठले. त्या ठिकाणी जमादार अशोक धामणे, दामिनी पथकाच्या आरती साळवे, अर्चना नाखाते यांनी या मुलांची चौकशी करून तातडीने ध्वनिक्षेपकावरून हरवलेली मुले मदत केंद्रात असल्याचे संदेश दिले. त्यानंतर अवघ्या काही वेळातच पोलीस कर्मचाऱ्यांनी हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले. मुलांना सुखरूप पाहून त्यांच्या आई-वडिलांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून देत पोलिसांची ही आभार व्यक्त केले

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article