दहशत पसरवण्यासाठी 9 वाहनांची टाेळक्याकडून काेयत्याने तोडफाेड:पुण्यातील वानवडी परिसरात घटना
5 hours ago
1
भाईगिरीची दहशत करत पुण्यातील वानवडी भागात भैरोबा नावा परिसरात टोळक्याने धारदार कोयते हातात मिरवत दहशत पसरविल्याची घटना घडली आहे.चार जणांच्या टोळक्याने रस्त्यावर पार्किंग करण्यात आलेल्या कार, रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशा नऊ वाहनांची जाेरदार तोडफोड काेयत्याने केली. याप्रकरणी पोलिसांकडून चार आराेपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयुर उत्तम गायकवाड (वय -32, रा. भैरोबानाला पुणे-सोलापूर रस्ता, वानवडी,पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे. भैरोबा नाला परिसरात सेंट पॅट्रीक चर्चजवळ चिमटा वस्ती असून त्याठिकाणी मयुर गायकवाड हे रहाण्यास आहे. आराेपींचे टोळके संबंधीत वस्तीत हातात कोयते आणि दांडके घेऊन आले.त्यांनी हातातील कोयते आणि लाकडी दांडके लाेकांवर उगारुन टोळक्याने दहशत पसरवली. सदर भागातील कार, रिक्षा, टेम्पो, दुचाकींची दांडक्याने तोडफोड करुन टोळक्याने रहिवाशांना शिवीगाळ देखील केली. संबंधित घटनेनंतर मयूर गायकवाड घरातून बाहेर पडल्यावर टोळक्याने त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. कोणी मध्ये पडले तर त्याला जिवे मारु’, अशी धमकी देऊन टोळके हातातील शस्त्र घेऊन पसार झाले.मात्र, पळून जाताना टोळक्याने कालव्याजवळ रस्त्यावर लावलेल्या दुचाकी आणि रिक्षाची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक फौजदार एस कुंभार पुढील तपास करत आहेत. पसार झालेल्या टोळक्याच्या शोध घेण्यात येत आहे. दोन लाखांचा मुद्देमाल चोरीस कात्रज भागात भरदिवसा एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील दागिने आणि रोकड असा दोन लाख 12 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.याबाबत अभिजित विठ्ठल झाडे (वय 26, रा. वाघजाईमाता अपार्टमेंट, वाघजाईनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झाडे कुटुंबीय गुरुवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)