सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये स्वतःची काळजी घेणे खूप कठीण होत आहे. त्यामुळे केसांसोबतच आपली त्वचा ही निर्जीव दिसू लागली आहे. अगदी मूलभूत गोष्टींसाठीही आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही आणि आपण काही स्किन केअर रुटीन पाळत असलो तरीही आपण त्या नीट पाळत नाही. त्यातीलच पहिली गोष्ट म्हणजे आपण दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा आणि चेहरा स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे हे देखील आपल्याला माहिती नाही.
चेहरा व्यवस्थित स्वच्छ केला नाही तर खीळ आणि मुरुमांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेक वेळा आपण कमी अधिक वेळा आपला चेहरा धुतो. त्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षणीय रित्या वाढते म्हणून मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून त्वचा खराब होण्यापासून वाचवता येईल.
दिवसातून किती वेळा चेहरा धुणे गरजेचे?
दिवसातून दोनदा चेहरा धुवा सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुणे आवश्यक आहे. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ केला तर त्वचा उत्पादने अधिक चांगल्या प्रकारे शोषणास सक्षम होईल. तसेच रात्री झोपण्यापूर्वी देखील चेहरा स्वच्छ धुणे आवश्यक आहे. जेणेकरून दिवसाची धूळ आणि मेकअप काढून टाकता येईल. यासाठी दिवसातून दोनदा चेहरा धुणे गरजेचे आहे. जर तुमचा चेहरा दिवसा तेलकट होत असेल तर तुम्ही तुमचा चेहरा धुवू शकता.
चेहरा धुतांना घ्या ही काळजी
चेहरा धुताना तुम्ही कोणता फेसवॉश किंवा कोणते क्लीनजर वापरत आहात याची विशेष काळजी घ्या. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही नेहमी फेसवॉश किंवा क्लिन्झर वापरा. जर यापैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार निवडली नाही तर तुमचा चेहरा व्यवस्थित स्वच्छ होणार नाही. चेहरा धुतल्यानंतर नेहमी टोनर आणि मॉइश्चरायझर वापरा.
जर तुम्ही टोनर वापरत नसाल तर काही हरकत नाही पण मॉइश्चरायझर लावणे महत्त्वाचे आहे. फेसवॉश मध्ये दाणे असलेल्या फेस वॉश वापरने टाळा यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. फेस वॉश नेहमी ओल्या चेहऱ्यावर लावा आणि ते त्वचेवर २० ते ३० सेकंदासाठी घासा यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.