दिवाळी, निवडणूक एकत्र आल्याने फटाक्यांचा ‘डबल धमाका’:शक्ती प्रदर्शनासाठी रॅली, मिरवणुकीसाठी फटाक्यांचा वापर
6 days ago
2
यंदा दिवाळी आणि विधानसभा निवडणूक एकत्रच आल्यामुळे फटाके विक्रीचा जसा ‘डबल धमाका’ झाला आहे. तसेच फटाके फुटण्याचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. धनत्रयोदशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत (तुळशी विवाह) शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यात आता निवडणुकीमुळे उमेदवारांची सभा, रॅली, मिरवणूक सुरू होण्याआधी किंवा मोठे नेते आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी केली जात असल्यामुळे फटाक्यांचा ‘डबल धमाका’ होताना दिसत आहे. दिवाळी व निवडणूक गृहित धरून यंदा फटाक्यांच्या दुकानांची संख्याही वाढल्याचे दिसून आले आहे. कच्च्या मालाची किंमत, मजुरी वाढल्याने यंदा फटाक्यांच्या किमतीत १० टक्के वाढ झाली. त्याचा कोणताही परिणाम विक्रीवर दिसून आला नाही. दिवाळीचे ५ दिवस फटाक्यांची विक्री झाल्यानंतरही यंदा कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी फटाक्यांच्या आतषबाजीची आवश्यकता भासत आहे. कुठेही प्रचार सभा असली व उमेदवार पोहोचला की, फटाक्यांची माळ फोडली जात आहे. सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेण्याचा नामी उपाय याद्वारे कार्यकर्ते उमेदवारांना सापडला आहे. रात्रीची सभा असली की, आकाशातील फटाक्यांची आतषबाजी लक्ष वेधून घेत आहे. यासाठी सेव्हन शॉट, ट्वेल्व्ह शॉट अशा फटाक्यांची मागणी केली जात आहे. दिवसा फटाक्यांची माळ तर रात्री आकर्षक फटाके शहरातील आकाशात सतत दिसत आहेत. तिकडे लहान बालकांची आकर्षक फटाक्यांना मागणी आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. कारण, शहरात अजूनही तुळशी विवाहानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. विविध प्रकारची झाडे, फुलझड्या, आकाशात जाऊन फुटणारे रंगीत फटाके. बालकांचे लक्ष वेधून घेत असल्याने ते पालकांकडे तसे फटाके खरेदी करण्याचा आग्रह करत आहेत. विवाह समारंभासाठीही फटाक्यांची खरेदी येत्या १७ नोव्हेंबरपासून लग्नाचा ठोक असल्यामुळे ज्यांच्याकडे विवाह समारंभ आहेत. त्याला आणखी आकर्षक करण्यासाठी वरातीत फोडण्यासाठी फटाक्यांची खरेदी होत आहे. एरव्ही स्वागत समारंभाला वधू-वराच्या आगमनाचे सूचक म्हणून आतषबाजी केली जाते. वरातीतही मोठा आवाज करणारे फटाके फोडले जातात. ऐनवेळी धावपळ नको म्हणून आधीच फटाके खरेदी करून ठेवले जात आहेत. यंदा फटाक्यांचा समाधानकारक व्यवसाय ^दिवाळी साजरी करण्यासाठी रंगीत, आकाशात जाऊन फुटणाऱ्या आकर्षक फटाक्यांना सर्वसामान्यांकडून चांगली मागणी राहिली. त्याचप्रमाणे उमेदवारांकडून आवाज असलेल्या फटाक्यांना मागणी दिसून आली. त्यामुळे यंदा आमचा व्यवसाय समाधानकारक झाला आहे. -राजेश सिंघई, फटाके विक्रेता.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)