दिव्य मराठी अपडेट्स:हवामान बदलानुसार श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पोशाखात बदल; विठ्ठल रुक्मिणीस कानपट्टी अंगावर शाल
6 hours ago
1
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... अपडेट्स थंडीमुळे विठ्ठल रुक्मिणीस कानपट्टी अंगावर शाल पंढरपूर - राज्यात हिवाळा सुरू झाला असून गेल्या चार ते सहा दिवसांपासून मध्ये थंडीची लहर सुरू आहे. हवामान बदलानुसार श्री विठ्ठल रुक्मिणीच्यापोशाखात ही बदल केला जातो. थंडीचा मौसम सुरू होताच कार्तिकी यात्रेच्या प्रक्षाळ पूजेनंतर पहाटेच्या वेळी श्री विठ्ठल रुक्मिणीस कानपट्टी बांधून अंगावर शालदेण्यात आले. गुरुवारी मंदिरात दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. पुतळा कोसळल्याप्रकरणी चेतन पाटील याला जामीन मुंबई - ऑगस्ट महिन्यात राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सल्लागार चेतन पाटील याला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलदिनी अनावरण केल्याच्या जवळपास नऊ महिन्यांनंतर 26 ऑगस्ट रोजी हा पुतळा कोसळला होता. पाटील याला 39 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती. पाटील याला पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून नियुक्ती न केल्यामुळे त्याचा या प्रकरणाशी संबंध दिसत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नाेंदवले. या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे यालाही अटक करण्यात आली हेाती. त्याच्या जामीन अर्जावर 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याचे हायकोर्टाने सांगितले. पुण्याच्या 21 मतदारसंघांत मतमोजणीच्या 465 फेऱ्या पुणे - पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे. अंतिम निकाल 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत जाहीर होईल. सर्व 21 मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 465 फेऱ्या होतील. सर्वात जास्त फेऱ्या पुरंदर मतदारसंघात तर सर्वात कमी फेऱ्या आंबेगाव मतदारसंघात होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, शनिवार सकाळी 8 वाजता सुरुवात होईल. पुणे शहरातील आठ मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. पिंपरी आणि भोसरी मतदारसंघाची मतमोजणी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे होणार आहे. तर उर्वरित मतदारसंघाची मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी होईल. नाशिक पश्चिमचा निकाल सर्वात उशिरा हाती येणार नाशिक - विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडल्यानंतर सर्वांच्या नजरा या उद्या शनिवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात त्या-त्या ठिकाणी ही प्रक्रिया पार पडेल. त्यात देवळाली आणि निफाड या मतदारसंघात बूथ कमी असल्याने मतमोजणीच्या सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी 29 फेऱ्या होतील. अर्थात तेथेच सर्वात आधी निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूने नाशिक पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक 39 फेऱ्या होणार असल्याने निकालासाठी येथे उमेदवारांना आणि समर्थकांनाही प्रतीक्षा करावी लागेल. नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघांमध्ये 4 हजार 922 मतदान केंद्र होती. शनिवारी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच वेळी मतमोजणी होईल. पहिले पोस्टल मतदान मोजण्यात येईल. त्यानंतर ईव्हीएममधील मते मोजण्यास सुरुवात होईल. दुपारी 2 पर्यंत कल समजून येतील असा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येतो आहे. ठाणे शहरात बोटावरील शाई पुसट झाल्याची अनेक मतदारांची तक्रार ठाणे - विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यावर बोटाला लावण्यात येणारी शाई बोट पाण्याने धुतल्यावर पुसट होत असल्याची तक्रार अनेक मतदारांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे केली. मात्र, आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन स्वत: लेखी तक्रार नोंदवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोपरी पाचपाखाडी, ठाणे शहर, अंबरनाथ, नवी मुंबई आणि मुरबाड मतदारसंघातील नागरिक अशी तक्रार करण्यात आघाडीवर होते. एका महिलेने सांगितले की, घरी आल्यावर आम्ही हात धुतले असता शाई पुसट झाल्याचे दिसून आले. आमच्या आजूबाजूला राहणाऱ्या इतर नागरिकांनाही असाच अनुभव आला. मात्र, आम्ही या विषयी कोणतीही तक्रार करू इच्छित नाही. दरम्यान, ठाण्याच्या उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील म्हणाल्या की, बोटावर लावण्यात येणार शाई ही पक्की असते. अशा प्रकारे शाई जाणे शक्य नाही. आम्ही जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता मतदारांच्या बोटांवरील शाई पुसट होणे अथवा निघून जाणे असे कोणतेही प्रकार आढळून आलेले नाही. शाळेच्या धार्मिक प्रार्थनेवरून कोल्हापुरात पालक आक्रमक कोल्हापूर - येथील जाधववाडीतील मनपाच्या प्रिन्स शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांकडून धार्मिक शब्द असलेली प्रार्थना म्हणवून घेतली जात असल्याने हिंदुत्ववादी संघटनांसह पालकांनी आक्षेप घेत शाळेच्या मुख्याध्यापिकेस जाब विचारला. मोठ्या संख्येने पालक शाळेत आल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शाळेबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रार्थनेमधील एक शब्द एक धर्माशी संबंधित असून ही प्रार्थना रोज विद्यार्थ्यांकडून वदवून घेत असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला. शाळेत आलेल्या पालक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिकेने सांगितले की, शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या प्रार्थनामध्ये ही प्रार्थना समाविष्ट आहे. तसेच मी या शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू होण्यापूर्वीपासून ही प्रार्थना मुलांना शिकविली जात आहे. मी परस्पर विद्यार्थ्यांना ही प्रार्थना शिकवलेली नाही. आपला आक्षेप असेल तर ही प्रार्थना घेतली जाणार नाही, पण तसे मला शिक्षण विभागाला कळवावे लागेल. त्यानुसार मुख्याध्यापिकेने प्राथमिक शिक्षण विभागाला पत्र देऊन तसे कळवले आहे. त्यानंतर हा वाद शमल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. बीडच्या लाचखोर पीआय खाडेकडेआढळली 2 कोटींची बेहिशेबी संपत्ती बीड - आर्थिक गुन्हे शाखेत असताना 1 कोटीच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकलेले, घरात 1 कोटीची रक्कम व 1 किलो सोने सापडलेले निलंबित पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्याकडे 2 कोटी 7 लाख 31 हजार रुपयांची बेहिशेबी संपत्ती आढळून आली. उत्पन्नापेक्षा 116 टक्के अधिक ही संपत्ती होती. ताडबोर गावात वन्यप्राण्यांमुळे पिकांची नासाडी; शेतकरी हैराण परभणी - एकीकडे निसर्गाच्या संकटांचा सामना करताना शेतकऱ्यांची दमछाक होत अाहे, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहे. वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन विभागाने यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी ताडबोरगाव शिवारातील शेतकऱ्यांतून होत आहे. मानवत तालुक्यातील ताडबोरगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी करून पिकाची लागवड केली आहे. गहू व इतर रब्बी पिके शेतात उभी असतानाच रानडुकरे, हरिण व इतर प्राण्यांकडून पिकांची नासाडी होत आहे. दरवर्षी वन विभागाकडे वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे अहवाल जातात. मात्र, त्याची भरपाई वर्षानुवर्षे मिळत नाही. सध्या ताडबोरगाव शिवारात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असतो. शेतकरी, शेतमजुरांवर अनेकदा प्राणघातक हल्ले झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊनच शेतीची कामे करावी लागत आहेत. वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. ईव्हीएमवरील नाव, निशाणी अस्पष्ट; पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी नांदेड - येथील लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीनवरील काही उमेदवारांची नावे व निशाणी अस्पष्ट होती. त्यामुळे मतदारांना मतदान करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे नांदेड लोकसभा पोटनिवडणूक रद्द करावी, अशी मागणी जनहित लोकशाही पार्टीचे उमेदवार नागोराव वाघमारे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. वाघमारे यांची निशाणी ऑटोरिक्षा असून ईव्हीएम मशीन यंत्रावरील त्यांचे नाव व निशाणी स्पष्ट नव्हती, असा आरोप आहे. गंगाखेडला शेतात शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू परभणी - गंगाखेड येथील वागदरी शिवारात शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी 6.39 च्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील वागदरी शिवारात घडली. या प्रकरणी पिंपळदरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गंगाखेड तालुक्यातील वागदरी येथील शेतकरी गोविंद रावसाहेब मुंडे (36) हे बुधवारी सकाळी शेतात काम करत होते. विजेच्या खांबाला त्यांचा धक्का लागला. त्या खांबात वीजप्रवाह उतरलेला होता. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. जमादार सुंदरराव शहाणे, पोलिस शिपाई राम पडघण यांनी पंचनामा केला. या प्रकरणी गंगाबाई मुंडे यांच्या खबरीवरून पिंपळदरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. महिला पाेलिसांना विश्रांतीसाठी माेबाइल व्हॅन ठाणे - ठाणे पाेलिस आयुक्तालयाच्या वतीने ड्यूटीवरील महिला कर्मचाऱ्यांसाठी माेबाइल रेस्टिंग व्हॅन सुरू केली. त्यात साेफा-कम-बेड, वाॅशरूम, वाॅश बेसिन व दाेन चेंजिंग रूम आहेत. स्तनपान करणाऱ्या मातांसाठीही सुविधा आहेत. व्हॅनमध्ये दोन महिला कर्मचारी तैनात केल्या जातील.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)