दिशा सालियनला इमारतीवरून ढकलून दिले:रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंवर रोख; पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर चौकशी लावण्याचा इशारा
6 days ago
2
दिशा सालियन नामक एका तरुणीला बलात्कारानंतर इमारतीवरून ढकलून देण्यात आले होते. त्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव होते. महायुतीला पुन्हा सत्ता मिळाली तर या प्रकरणाची चौकशी लावली नाही तर नाव नाही सांगणार, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाला दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची गुरुवारी दापोलीत सभा झाली. त्यात त्यांनी रामदास कदम यांच्यावर येथेच्छ टीका केली. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले, दिशा सालियन नामक एक तरुणी होती. तिच्यावर बलात्कार झाला. त्यानंतर तिला एका इमारतीवरून ढकलून देण्यात आले. या प्रकरणात त्यांचे (आदित्य ठाकरे) नाव होते. मी आज त्यांना पुन्हा सांगतो. आम्हाला पुन्हा सत्ता मिळाली तर या सर्व प्रकरणाची चौकशी लावली नाही तर मी माझे नाव रामदास कदम सांगणार नाही. आदित्य ठाकरे मध्यरात्री 12 ला घराबाहेर पडतात अन्... ते पुढे म्हणाले, आदित्य ठाकरे यांची औकात काय आहे? ते रात्री 12 ला घराबाहेर पडतात आणि पहाटे 5 वा. गुपचूप घरी परतात. त्यांचे रात्रीचे धंदे महाराष्ट्राला समजले पाहिजेत. त्यांनी आपली औकात पाहून बोलावे. शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आम्ही अंगावर केसेस घेतल्या. तुरुंगात गेलो. त्यांचे पक्षासाठी कोणते योगदान आहे? ते आयत्या बिळावर नागोबा होऊन बसलेत. त्यांनी आपण कुणावर बोलत आहोत, याचे भान ठेवण्याची गरज आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेनेतील बंडखोरीनंतर रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाणे पसंत केले. तेव्हापासून ते सातत्याने उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तर त्यांच्या टीकेला अधिकच धार आली आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाने रामदास कदम व त्यांचे सुपुत्र योगेश कदम यांना धडा शिकवण्यासाठी दापोली विधानसभा मतदारसंघात आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आता पाहूया काय म्हणाले होते आदित्य ठाकरे? मी लहानपणापासून अनेकांना काका म्हणत आलो. पण त्या काकांनीच आमच्याशी गद्दारी केली. आता पुन्हा तुम्हाला गुंडा-फुंडांचे सरकार आणायचे आहे का? यांची गुंडगिरी व एकाधिकारशाही संपवण्याची गरज आहे. मी माझ्या सभेसाठी मुद्दाम अशा काही ठिकाणांची निवड केली आहे. आम्ही शांत आहोत. यापुढे या भागात कुणी तुमच्यावर दादागिरी केली, हात उचलण्याचा प्रयत्न केला, तर काळजी करू नका. आपले सरकार येत आहे. या लोकांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी असेल, असे आदित्य ठाकरे आपल्या दापोली येथील सभेत रामदास कदम व उदय सामंत यांच्यावर टीका करताना म्हणाले होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)