Published on
:
08 Feb 2025, 7:36 am
Updated on
:
08 Feb 2025, 7:36 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : आपसाठी अस्तित्वाची लढाई तर भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाला आहे. यामध्ये 'आप'ला मोठा हादरला बसला असून तब्बल २७ वर्षांनंतर भाजपने दिल्ली विधानसभेवर भगवा फडकवला आहे. लक्षवेधी ठरलेल्या नवी दिल्ली मतदासरंघात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघात भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांचा विजय झाला आहे. अरविंद केजरीवाल यांना 3 हजार 138 मतांनी पराभव स्विकारावा लागला आहे.यावर बोलताना आम आदमी पक्षाचे माजी नेते, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी खरमरित टिका करत "दुर्योधनाचा अंत झाला" अशी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी पुढे बोलताना विश्वास म्हणाले, "मी भाजपचे विजयाबद्दल अभिनंदन करतो आणि मला आशा आहे की ते दिल्लीच्या लोकांसाठी काम करतील. मला अशा माणसाबद्दल सहानुभूती नाही ज्याने आप पक्षाच्या कार्यकर्त्यांची स्वप्ने भंग केली. दिल्ली आता त्याच्यापासून मुक्त झाली आहे. त्यांनी त्या स्वप्नांचा वापर त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी केला. आज, न्याय मिळाला आहे."