देवेंद्र फडणवीस VS शरद पवार VS नाना पटोले:‘व्होट जिहाद’: पवारांचा ब्राह्मण समाज, पटोलेंचा संघावर निशाणा

2 hours ago 1
मुस्लिमांनी मविआच्याच उमेदवारांना मतदान करावे, असे ऑल इंडिया उलेमा कौन्सिलचे प्रमुख नोमाणींनी आवाहन केले. हा व्होट जिहाद असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्यावर शरद पवार म्हणाले की, पुण्याच्या कसबा पेठेत एक समाज भाजपला सातत्याने मतदान करतोे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, आरएसएसही धार्मिक संघटना आहे. ती भाजपचा प्रचार करते. त्याचे काय? विशिष्ट समाजाचे लोक सातत्याने फक्त भाजपलाच मतदान करतात- पवार सत्ताधारी ज्या अर्थी हा विषय पुढे करत आहेत. याचा अर्थ आपल्याला यश मिळणार नाही, अशी खात्री त्यांना झाली आहे. म्हणूनच ते असा विषय बाहेर काढत आहेत. त्या समाजाची आम्हाला सवय झाली. पुण्यातील काही मतदारसंघांत विशिष्ट समाज भाजपलाच मतदान करतो. त्या समाजाची आम्हाला सवय झालीय. व्होट जिहाद हा शब्द वापरून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी एक प्रकारे या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थ : कसबा मतदारसंघात भाजपलाच मतदान करणाऱ्या ब्राह्मण समाजावर पवारांनी निशाणा साधला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिमांनी मविआला मतदान केले. एखाद्या मतदारसंघात विशिष्ट समाजाने एखाद्या पक्षाला मतदान केले तर तो त्यांचा अधिकारच आहे. हा व्होट जिहाद नाही. भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्काराचे मौलाना नोमाणींचे आवाहन- फडणवीस लोकसभेत भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, त्यांचे दाणापाणी बंद करा, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घाला, असे नोमाणींचे आवाहन आहे. मविआकडून मुस्लिम मतांचे धुव्रीकरण, मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करून कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची असे मविआने ठरवले आहे. व्होट जिहादचे सिपाह सालार राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले असल्याचे मौलाना नोमाणींनी मतदानाचे आवाहन करणाऱ्या व्हिडिओत सांगितले आहे. अर्थ : मुस्लिम एकगठ्ठा मते मविआकडे वळतील, असे सांगून हिंदू मते महायुतीकडे खेचण्याचा प्रयत्न. धर्माचा वापर करून मविआतील तीनही घटक पक्ष व्होट जिहाद करीत आहेत. या देेशाच्या इतिहासातील निवडणुकीत मुस्लिमांचे इतके लांगूलचालन यापूर्वी कधी पाहिले नव्हते. मुस्लिम संघटनेने एखाद्या पक्षाला मतदानाचे आवाहन केले तर गैर काय? एखादी मुस्लिम संघटना एखाद्या पक्षाला मतदान करण्यासाठी आवाहन करत असेल, तर यात गैर काय? आरएसएसही धार्मिक संघटना आहे. ती भाजपचा प्रचार करते. त्याचं काय? भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणतात की त्यांना आरएसएसची गरज नाही. मग आरएसएसचे लोक कशाला प्रचारासाठी मैदानात उतरतात? याचं उत्तर आधी फडणवीस यांनी द्यावं. आम्हाला संघटनेने दिलेल्या पत्रातील कोणत्या मागण्या मान्य कराव्यात हे ठरायचं आहे. जेव्हा जेव्हा निवडणूक येते तेव्हा तेव्हा भाजपचे नेते हिंदू-मुस्लिम करतात. पण ज्या वेळी ईद येते, त्या वेळी हेच नेते मुस्लिमांकडे जाऊन बिर्याणी खातात.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article