धार्मिक घोषणा देत नवनीत राणांच्यासभेमध्ये धुडगूस:खुर्च्यांची तोडफोड, अमरावती जिल्ह्यातील खल्लारची घटना

3 hours ago 1
बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी व भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांची शनिवारी रात्री दर्यापूर मतदारसंघातील खल्लार गावात प्रचार सभा आयोजित केली होती. मात्र रात्री १० च्या सुमारास अचानक एका जमावाने या सभेतील प्रेक्षकांमध्ये घुसून धुडगूस घातला. तसेच धार्मिक घोषणाबाजी केली. सभास्थानी असलेल्या खुर्च्यांची तोडफोड केली. दरम्यान, हल्लेखोरांवर कारवाईच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यात राणा ठाण मांडून बसल्या होत्या. भ्याड हल्ल्याची चौकशी करा- राणा आमदार रवी राणा यांनी सांगितले की, पोलिस संरक्षणात सभेला गेलेल्या नवनीत राणा यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या दिशेने खूर्च्या फेकण्यात आल्या. सुदैवाने त्यांना इजा झाली नाही मात्र पोलिसांना इजा झाली. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले. माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडून खल्लार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या राड्यानंतर खल्लार गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनीत राणांचा इशारा आम्ही शांततेत आम्ही आमचा प्रचार करत होतो. मात्र भाषणादरम्यान विचित्र पद्धतीने इशारे केले जात होते. माझ्या कार्यकर्त्यांना त्यांना समजवण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्यांना अचानक आमच्यावर हल्ला केला. माझे कार्यकर्ते, अंगरक्षकांनी मला सुरक्षित तेथून बाहेर काढलं. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केलं आहे. याप्रकरणी आज अटक झाली नाही संपूर्ण हिंदू समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article