देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करा:संभाजीनगर जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहून मागणी
2 hours ago
1
विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देवाला साकडे घालण्यात येत आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील देव पाण्यात घालून ठेवल्याचे म्हटले जात आहे. त्यातच भाजपच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिला पदाधिकारी मनीषा गणेश मुंडे- वाघ यांनी आपल्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा देवा भाऊ यांनाच महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपण महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने ही विनंती करत असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मनीषा गणेश मुंडे- वाघ यांनी लिहिलेले पत्र देखील वाचा.... "एकच भाऊ - देवा भाऊ " संपुर्ण महाराष्ट्रातील आमच्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ.... प्रति, माननीय भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जी
माननीय फायर ब्रँड भारत देशाचे गृहमंत्री अमित भाई शहाजी
महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच निवडणुका झाल्या ,त्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडक्या बहिणीचे उपमुख्यमंत्री माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यात विधानसभेत घवघवीत यश प्राप्त केले त्यांना मागील पाच वर्षात आमच्या देवा भाऊंना विरोधकांकडून जातिवाचक शेरबाजी, पत्नीवरून अभद्र शेरबाजी , आई वरून शिवीगाळ, अटकेचे षडयंत्र , शारीरिक टिपण्या , मराठा आरक्षण आंदोलनात खलनायकाचा शिक्का, इतकं सगळं सहन करूनही न डगमगता न थांबता अहोरात्र फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करणारा आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा देवा भाऊ यांनाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी द्यावी ही आदरणीय देशाचे पंतप्रधान व देशाचे गृहमंत्री यांना महाराष्ट्रातच महाराष्ट्रातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीची मनःपूर्वक विनंती...
धन्यवाद!!
आपलीच भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठ कार्यकर्ती
सौ.मनीषा गणेश मुंडे-वाघ
छत्रपती संभाजीनगर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)