देशाचा विकास, प्रगतीचा मार्ग हा संविधानातील मूल्यांवर आधारीत:प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांचे प्रतिपादन; सांगळूदकर महाविद्यालयात कार्यक्रम‎

2 hours ago 1
भारतीय संविधान सभेने १९४९ मध्ये संविधान मंजूर केले होते. हे संविधान भारताच्या सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्याची पायाभूत रचना आहे. संविधानाने विविधता आणि एकता यांचा आदर्श ठेवून देशाला जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रांमध्ये अग्रगण्य स्थान दिले, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी केले. येथील जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाच्या सभागृहात राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बोडखे बोलत होते. आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. मनीष होले, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. निलय अढाऊ, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.राहुल सावरकर आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बोडखे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांच्या योगदानाची आठवण ठेवून प्रत्येकाने त्या पद्धतीने वागले पाहिजे. देशाचा विकास आणि प्रगतीचा मार्ग हा संविधानातील मूल्यांवर आधारीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, बाबासाहेब सांगळूदकर व कोकिळाबाई गावंडे यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शेवटी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. जी. सावरकर यांनी केले. सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पानतावणे यांनी केले. आभार प्रा. एन. पी. अढाऊ यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. अमरावती येथील महावितरणच्या विद्युत भवन येथे मंगळवारी संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. संविधानिक मूल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वेळी अधीक्षक अभियंता दीपाली माडेलवार, सहायक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, कार्यकारी अभियंता राजेश माहुलकर, उपविधी अधिकारी प्रशांत लहाने यांच्यासह अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठात उद्देशिकेचे वाचन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे उपस्थित होते. संविधान दिनाबद्दल जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी माहिती देऊन संविधान दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी पुष्कर देशपांडे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. नीलेश कडू, आयक्यूएसी संचालक डॉ. संदीप वाघुळे तसेच विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते, असे कळवण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article