गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेमध्ये लाच आणि फसवणुकीचे आरोप लावण्यात आले आहे. न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टात याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून अदानींसह त्यांचा पुतण्या सागर आणि अन्य 6 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. अदानींविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे. हिंडेनबर्ग प्रकरणानंतर अदानींचा आणखी एक कारनामा समोर आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसनेही एक व्हिडीओ शेअर केला असून नरेंद्र मोदी अदानींच्या एजंटप्रमाणे काम करतात, असे म्हणत घणाघात चढवला.
नरेंद्र मोदी अदानींच्या एजंटप्रमाणे काम करत असून संपूर्ण देशाला हे माहिती आहे. जेव्हा कधी मोदी विदेशात जातात तेव्हा त्या देशातील कंत्राटे काही महिन्यांनी अदानींना मिळतात, असा आरोप काँग्रेसने माध्यमातील वृत्तांचा दाखला देत केला आहे.
व्हिडीओत काय म्हटले?
- जून 2015 मध्ये मोदींनी बांगलादेशला भेट दिली आणि तत्कालिन पंतप्रधान शेख हसिन यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन महिन्यात अदानींचा बांगलादेशसोबत वीजपुरवठ्याचा करार झाला.ृ
- फेब्रुवारी 2020 मध्ये मोदींनी श्रीलंकेच्या पंतप्रधानांची भेट घेतली आणि काही महिन्यांनी अदानींना श्रीलंकेमध्ये विंड एनर्जीचा प्रोजेक्ट मिळाला.
- डिसेंबर 2023 मध्ये मोदींनी केनियाच्या राष्ट्रपतींची भेट घेतली आणि सहा महिन्यात अदानींना केनियातील विमानतळाचे कंत्राट मिळाले. मात्र याविरोधात निदर्शने झाल्याने हायकोर्टाने हे कंत्राट रोखले.
अदानींमुळे मोदींनी देशावर डाग लावला! संजय राऊत यांचा हल्लाबोल
याचाच अर्थ मोदींनी आपल्या परममित्राला कंत्राट मिळवून देण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली. एवढेच नाही तर मोदींनी सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया, इस्रायल, तंझानिया आणि नेपाळशी संबंधित करारातही एजंटप्रमाणे काम केले, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
अडानी के एजेंट की तरह काम करते हैं नरेंद्र मोदी pic.twitter.com/rCbPVkUXcF
— Congress (@INCIndia) November 21, 2024
चौकशीची मागणी
दरम्यान, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनीही यासंबंधी एक ट्विट केले आहे. अदानी समूहाची भारत सरकार चौकशी करणार आहे की नाही ? धारावी प्रकल्पाचीही चौकशी व्हायला पाहिजे. आज संपूर्ण जगभर भारताची नाचक्की झाली आहे, अदानी यांच्यासाठी स्वतः पंतप्रधान मार्केटींग करतात त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.
अदानी समूहाची भारत सरकार चौकशी करणार आहे की नाही ? धारावी प्रकल्पाचीही चौकशी व्हायला पाहिजे.
आज संपूर्ण जगभर भारताची नाचक्की झाली आहे, अदानी यांच्यासाठी स्वतः पंतप्रधान मार्केटींग करतात त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट…
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) November 21, 2024