अभिनेत्री रवीना टंडन आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, एक काळ असा होता जेव्हा रवीना तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असायची. बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करत असताना रवीना हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच अभिनेत्यासोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्री अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केलं. रवीना टंडन, अनिल थडानी यांची दुसरी पत्नी आहे.
अनिल थडानी यांच्या पहिल्या पत्नीचं नाव नताशा सिप्पी असं आहे. एका रितेश सिधवानीच्या न्यूइयर पार्टीमध्ये रवीना तिच्या पतीसोबत पोहोचली होती. पार्टीमध्ये अभिनेत्रीची सवत नताशा देखील होती. रिपोर्टनुसार, पार्टीमध्ये असं काही झालं, ज्यामुळे रवीनाने ज्यूसचा ग्लास सवतीच्या अंगावर फेकला.
एका जुन्या मुलाखतीत रवीनाच्या सवतीने घडलेली घटना सांगितली. नताशा म्हणाली, ‘माझ्यामुळे रवीनाला ईर्शा वाटत होती. मी माझ्या मित्रांसोबत रितेश सिधवानीच्या घरी पार्टीसाठी गेली होती. मला अनिल आणि रवीना यांची काहीही चिंता नव्हती. मी पार्टीचा आनंद घेत होती.’
‘मी रितेशच्या चुलत भावासोबत होती. तेथे बसण्यासाठी सोफ्यावर फक्त 2 सीट होते. त्यामुळे आम्ही एकाच सोफ्यावर बसण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट रवीनाला आवडली नव्हती. रागाच्या भरात रवीनाने स्वतःवरचं नियंत्रण गमावलं होतं. यावर मी काहीच करू शकत नव्हती.’
‘रवीना जोर – जोरात ओरडू लागली आणि हीला पार्टीतून बाहेर काढा… असं म्हणू लागली. तिच्या मझ्यावर एक ग्लास फेकून मारला. तेव्हा पार्टीतून बाहेर पडली. पण नंतर मला कळलं की माझ्या बोटातून रक्त येत आहे . कारण ग्लास काचेचा असल्यामुळे मला जखम झाली होती…’ असं देखील नताशा म्हणाली.
रवीना – अनिल यांचं लग्न
बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना रवीना हिने 2004 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि रवीना हिने फिल्म डिस्ट्रीब्यूटर अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रवीना आणि अनिल यांच्या लग्नाला 21 वर्ष झाली आहेत. त्यांना दोन मुलं देखील आहेत. मुलगी राशा थडानी आणि रणबीर थडानी दोघांच्या मुलांची नावे आहेत.