नांदगाव पोलीस ठाणे हद्दीतील अवैद्य धंद्यावर, तसेच दहशत पसरवणाऱ्यांवर प्रतिबंधक तसेच तडीपारची कारवाई करण्यात आली आहे.File Photo
Published on
:
15 Nov 2024, 3:54 am
नांदगाव पुढारी वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नांदगाव विधानसभा निवडणूक मतदार संघात आचारसंहिता कालावधीत नांदगाव पोलीस ऍक्शन मोड वरती आले असून, नांदगाव पोलीस ठाणे हद्दीतील अवैद्य धंद्यावर, तसेच दहशत पसरवणाऱ्यांवर प्रतिबंधक तसेच तडीपारची कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये पोलिसांकडून, १६१ जणांवरती प्रतिबंधक तर २५ जणांवर तडीपार ची करण्यात आली असून, तसेच विविध पक्षातील ७८ गावांमधील २६३ पदाधिकारी कर्मचारी यांना आचारसंहिता भंग न होऊ देण्याबाबत ची नोटीस बजावण्यात आली आहे.
आचारसंहितेचा भंग केल्यास कारवाई करत, गुन्हा दाखल करण्यात येईल अशी तंबी देण्यात आली आहे. तसेच पोलीस ठाणे हद्दीतील अवैध्य धंद्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.शहरातील हॉटेल्स, लॉज यांच्या पाहणी देखील पोलिसांकडून करण्यात आली असून,तसेच समाजकंटकांकडून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांची करडी नजर ठेवली जात आहे. या येणाऱ्या निवडणूक काळात सर्व नागरिकांनी तसेच विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे अवहान नांदगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नांदगाव पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाया.
•अवैद्य धंद्यांवर झालेली कारवाई : ४५
•प्रतिबंधक कारवाई केलेल्याची संख्या: १६१
•तडीपार करण्यात आलेल्यांची संख्या : २५
•आचारसंहिता भंग न होऊ देण्याबाबत देण्यात आलेली नोटीस : २६३
•विविध गुन्ह्यातील पकड वॉरंट आरोपी संख्या : २०
नांदगाव मतदार संघातील सर्व नागरिकांनी शासकीय यंत्रणेत तसेच पोलीस यंत्रणेस सहकार्य करावे. नागरिकांनी निर्भीडपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा. निवडणुकीच्या काळात कोणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल.असे कोणी आढळल्यास आमच्या सोबत त्वरित संपर्क साधा
प्रीतम चौधरी पोलीस निरीक्षक नांदगाव