नागपुरात फोल्‍डिंग हेल्‍मेटचे जुगाड; डिझाईनला मिळाले पेटंट!

3 hours ago 2
पुढारी वृत्तसेवा

Published on

22 Jan 2025, 9:40 am

Updated on

22 Jan 2025, 9:40 am

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूरकरांची एक वेगळी ओळख देखील आहे. कुठल्याही अवघड बाबतीत ते काहीतरी मध्यम मार्ग अर्थात सोयीचे जुगाड जमवतात. आता नागपुरातील प्रा.डॉ संजय ढोबळे यांनी अशक्य पण शक्य झालेले आणि पेटंट देखील मिळवलेले फोल्डिंग हेल्मेटचे जुगाड शोधून काढले आहे. सध्या वाहन चालकांना या हेल्मेटची प्रतीक्षा आहे. दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या चालकासह मागे बसणाऱ्या सहप्रवाशाला देखील हेल्मेट घालण्याची मध्यंतरी सक्ती करण्यात आली. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेच्या विरोधानंतर हा निर्णय तूर्तास मागे पडला असला तरी या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आला. दोन मुलांना शाळेत सोडताना किंवा लग्न समारंभात पत्नीला घेऊन जाताना दुचाकीवर दोन हेल्मेट सांभाळायचे कसे? ठेवायचे कुठे? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले. मात्र, आता या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. पर्यायाने दुचाकी चालकांची चिंता मिटणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि एका विद्यार्थिनीने या अफलातून 'फोल्डिंग हेल्मेट'ची डिझाईन तयार केली. विशेष म्हणजे या डिझाईनला 'आंतरराष्ट्रीय पेटेंट' ही मिळालं आहे. १ ते दीड महिन्याच्या कालावधीत हे नाविन्यपूर्ण हेल्मेट तयार होणार असल्याची माहिती प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे यांनी दिली.

दिवसेंदिवस अपघाताचे, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच राज्याच्या अनेक महत्वपूर्ण शहरांमध्ये दुचाकीने प्रवास करणाऱ्या दोघांनाही हेल्मेटची सक्ती करण्यात आली. नागपूर रातूम विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे यांनी 'एमएससी'ची विद्यार्थिनी आदिती देशमुखच्या मदतीनं एका 'फोल्डिंग हेल्मेटची' डिझाईन तयार केली. केवळ डिझाईनच तयार केली नाही तर त्याचं पेटंट ही मिळवले. दोन हेल्मेट दुचाकीमध्ये ठेवता येणारे नाविन्यपूर्ण संशोधन त्यांनी केले.

नियमाने दुचाकी चालवताना हेल्मेट घालून गाडी चालवणं अनिवार्य आहे. साधारणत दुचाकीमध्ये एकच हेल्मेट ठेवायची व्यवस्था केलेली असते. मात्र, दोघांसाठी सरकारने हेल्मेट अनिवार्य केले. मग दुसरे हेल्मेट ठेवायचे कुठे? हा मोठा प्रश्न असतो. आता यावर संशोधकांनी उपाय शोधला आहे. डॉ. संजय ढोबळे आणि विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी संशोधन करून वाहन उभे केल्यावर दोन्ही हेल्मेट कसे ठेवता येईल, याकरिता फोल्डिंग हेल्मेटची संकल्पना प्रत्यक्षात आणली. कार्यपद्धती आणि मजबुती देखील नियमित हेल्मेटप्रमाणे राहील याची काळजी त्यांनी घेतली. आता या निमित्ताने दुचाकीमध्ये फोल्डिंग हेल्मेट ठेवण्याची व्यवस्था होणार असल्याची माहिती प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे यांनी दिली.

आता सर्वांना प्रतीक्षा आलेले हे नाविन्यपूर्ण हेल्मेट तयार करण्याचे कार्य सुरू झाले असून या हेल्मेटची मजबूती नियमित हेल्मेटप्रमाणे असणार आहे. अपघाताच्या वेळी डोक्याला इजा होणार नाही, या प्रकारे साहित्य वापरण्यात येणार आहे. फोल्डिंग हेल्मेट उघडल्यावर व्यवस्थित उघडून ते डोक्यावर घालता येणार आहे. आजच्या परिस्थितीत जी दुचाकी वाहने आहेत, त्यामध्ये एकच हेल्मेट ठेवण्याची व्यवस्था आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article