जायकवाडी धरणाचा मासा म्हणून गोड पाण्यातील सर्वात खाण्यासाठी चवदार व आरोग्यदायक असलेला मासा आता जायकवाडीत नावापुरता राहतोय की काय अशी शंका निर्माण होत आहे. सध्या धरणात केवळ चिलापी याच प्रजातीचा मासा ८० टक्केहून अधिक आढळून येत आहे. इतर माशांना मात्र तो जगू देत नाही. त्यामुळे खवय्यांना खुणावणारे गावरान वाम, कटला, रावस, मरळ, खवली हे मासे जलाशयांतून हद्दपार होत असल्याचा प्रकार समोर येत असून धरणात तत्काळ शासनाने मत्स्यबीज टाकण्याची मागणी मच्छीमार संघटनेचे नेते बजरंग लिंबोरेसह उमेश पंडुरे, भगवान घटे, प्रा. डॉ. दिलिप बिरुटे आदींनी केली. धरणात मुबलक साठा असल्याने मासेमारीला चांगले दिवस आले आहेत, दररोज १० ते १५ टन माशांची विक्री होत आहे. Q : चिलापी माशामुळे इतर माशांमध्ये घट होत आहे का? A. जायकवाडी धरणात ८० टक्क्यांपर्यंत चिलापी मासा आढळून येतो. हा मासा कोणत्याही प्रकारचे अन्न खातो, त्यामुळे तो झपाट्याने वाढत आहे. Q : वर्षात चिलापीमध्ये किती वाढ होते? A. वर्षातून तीन वेळा हा मासा प्रजनन करतो. यामुळे इतर माशांच्या तुलनेत त्याची संख्या वाढते. जोपर्यंत त्याची पिल्ले मोठी होत नाहीत तोपर्यंत हा मासा पिल्लांना आपल्या तोंडात वाढवतो. Q : ‘चिलापी’ रोखण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? A. इतर मासे वाढण्यासाठी मत्स्यबीजासह इतर माशांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. Q. : चिलापीमुळे पाणी दूषित किंवा प्रदूषणयुक्त होण्याचा धोका आहे का? A. अजिबात नाही. पण, पाण्यातील शेवाळसह पाणी शुद्ध करतील असे मासे चिलापी खातात. {मधुरिमा जाधव, सहायक आयुक्त, मत्स्य विभाग, संभाजीनगर दिव्य मराठी एक्स्प्लेनर तातडीने उपाययोजना राबवण्याची गरज ^चिलापीचे आक्रमण थोपवणे गरजेचे आहे. स्थानिक माशांच्या जाती जतन कराव्या लागतील. त्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात. यासाठी मत्स्यबीज सोडण्यात यावे. वेळप्रसंगी आम्ही मच्छीमारांच्या वतीने मत्स्यबीज सोडू. यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी. -बजरंग लिंबोरे, मच्छीमार संघटनेचे नेते, पैठण
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)