नाशिक-गुजरात महामार्गावरील सापुतरा घाटात 200 फूट खोल दरीत लक्झरी बस कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे 5.30 वाजता हा अपघात घडला. या अपघातात 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.
अपघात इतका भीषण होता की बसचा चक्काचूर झाला. नाशिकला देवदर्शन करून भाविकांची बस गुजरातला परतत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी रवाना झाले.