sudhanshu shukla:आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे पहिले भारतीय अंतराळवीर होणार आहे. ते लढाऊ विमान उडवण्यात मास्टर आहे. त्यांची ॲक्सिअम मिशन 4 साठी पायलट म्हणून निवड झाली आहे. हे मिशन यावर्षी स्पेसएक्स ड्रॅगन अंतरीक्ष यानावर लॉन्च करण्यात येणार आहे. ॲक्सिअम मिशन ४ साठी अमेरिकेतील खासगी अवकाश कंपनी ॲक्सिअम स्पेसने पुढाकार घेतला आहे.
भारतीय हवाई दलात पायलट असलेले शुभांशु शुक्ला नासाच्या माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्या नेतृत्वाखालील संघात सामील होतील. या मिशनमध्ये ते मिशन कमांडर असणार आहेत. त्याच्यासोबत पोलंडचे स्लोज उझनान्स्की-विस्नीव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे दोन मिशन तज्ज्ञ असणार आहे. हे मिशन केवळ इस्त्रो पहिल्या अंतराळवीरास अंतराळात पाठवणार नाही तर पोलंड आणि हंगेरीमधील अंतराळवीरांनाही पहिल्यांदा अंतरळात थांबण्याची संधी मिळणार आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे भारताचे पहिले अंतराळवीर असतील.
मिशनबद्दल आनंद व्यक्त करताना शुभांशु शुक्ला म्हणाले की, भारतातील लोकांसोबत त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी ते तयार आहे. देशाच्या विविध भागातून सांस्कृतिक वस्तूंची अंतळात घेऊन जाण्याची त्यांची योजना आहे. अंतराळ स्थानकात योगमुद्राही त्यांना करायची आहे. हे मिशन 14 दिवस चालणार आहे. त्या दरम्यान चालक दल सूक्ष्म गुरुत्वाकर्षणमध्ये वैज्ञानिक प्रयोग, आउटरीच प्रोग्राम करणार आहे. Ax-4 मिशन खासगी अंतराळविरांना नेण्याचा उपक्रम आहे.
हे सुद्धा वाचा
कोण आहे शुभांशु शुक्ला
10 ऑक्टोबर 1985 मध्ये लखनऊमध्ये जन्म शुभाशु शुक्ला यांचा जन्म झाला. जून 2006 मध्ये ते भारतीय हवाईदलात दाखल झाले. मार्च 2024 मध्ये ते ग्रुप कॅप्टन बनले. शुभांशु शुक्ला यांनी Su-30 MKI, MIG-21, MiG-29, जगुआर, हॉक, डोर्नियर आणि An-32 सह विविध विमानांवर 2,000 पेक्षा अधिक तास उड्डान केले आहे.
2019 मध्ये त्यांनी रशियाच्या गगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये अंतराळ यात्री म्हणून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर भारताच्या गगनयान मिशनसाठी त्यांची इस्त्रोकडून निवड झाली. नासा-एक्सिओम स्पेस अंतर्गत अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले अंतराळवीर ते असणार आहेत. परतल्यानंतर भारतीयांसाठी फोटो आणि व्हिडिओंद्वारे त्यांचे अंतराळ अनुभव सांगण्याची त्यांची योजना आहे.