गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशीलपणा परत एकदा दिसून आला. गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटी या सतरा वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांनी त्याला दाखल केलं. हे दाम्पत्य चार दिवसांपासून उपाशी होते. पुढील खर्चासाठी त्यांना पैशांची गरज होती. ही परिस्थिती समोर येताच फडणवीस यांनी क्षणाचाही विलंब न करता या कुटुंबाला मदतीचा हात पुढे केला.
उपचारासाठी आईने मंगळसूत्र मोडले
मुलावर उपचारासाठी आई-वडिलांकडे पैसे नसल्याने मुलाच्या आईने मंगळसूत्र विकले आणि एक लाख रुपये रुग्णालयाकडे जमा केले. मात्र उपचारासाठी आणखी रक्कम हवी होती. त्यांना मुलाची देखभाल करत असताना खाण्यासाठी ही पैसे उपलब्ध नव्हते. चार दिवसांपासून पैशांची जमवा जमव करण्यासाठी त्यांनी पोटाला चिमटा दिला.
हे सुद्धा वाचा
मुख्यमंत्र्यांचे तात्काळ मदतीचे निर्देश
एका मेसेज द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल रात्री ही माहिती समजल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख असलेले रामेश्वर यांना तात्काळ मोफत उपचारासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यातून भामरागडच्या त्या अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटी वर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात आता पूर्णपणे मोफत आणि चांगले उपचार सुरू आहेत.
मंगळसूत्राची रक्कम मिळणार
तसेच मंगळसूत्र विकून भरलेले एक लाख रुपये ही त्यांना परत मिळणार आहेत. एका मेसेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करून त्यांच्यातील संवेदनशीलपणा आणि कारवाईसाठी असलेली तत्परता दाखवून दिली आहे.
वन प्राण्यांची शिकार करणारी टोळी ताब्यात
जिवंत विद्युत प्रवाह सोडून वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी गडचिरोलीच्या वन विभागाने ताब्यात घेतली. या टोळीमध्ये एकूण बारा आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. ही टोळी नेहमीच विद्युत ताराच्या मदतीने वन्य प्राण्यांची शिकार करायची. या अगोदर ही या भागात अस्वल, हरणी व बिबट्याचे शिकार झाले होते. सदर घटना चामोर्शी तालुका अंतर्गत खूनघाडा वनपरिक्षेत्र जंगल परिसरात घडली होती. अजून काही आरोपी फरार असून सदर आरोपींनी यावेळी नील गाईची शिकार केली होती.