अकोला (Akola Crime) : शहरातील खदान व सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन हद्दीतील एटीएममधून बॅटर्या चोरणार्या मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला पातूर तालुक्यातील चतारी येथून अटक करून एकूण २८ नग बॅटरी जप्त केली आहे. या (Akola Crime) कारवाईत खदान पोलिसांनी ३ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
६ ऑक्टोबर २०२४ रोजी गोरक्षण मार्गालगत असलेल्या देविप्लाझा कॉम्प्लेक्समधील एसबीआयच्या एटीएममधून तीन अज्ञात चोरांनी बॅकरूममध्ये ठेवलेल्या ६५ एएचच्या एक्साईड कंपनीच्या आठ नग बॅटर्या असा एकूण किमत अंदाजे ५५ हजार रुपयांच्या बॅटरीज चोरून नेल्या होत्या. सदर गुन्ह्यातील आरोपी भगवान विश्वनाथ सदार रा. चतारी तालुका पातूर यास अटक केली असता, त्याने (Akola Crime) गुन्ह्यात चोरी केलेल्या बॅटर्या तसेच अकोला शहरातील पोलिस स्टेशन सिव्हिल लाइन कलम ३३४ (१), ३०५ बीएनएस गुन्ह्यातील एटीएममधून एकूण ६५ एएचच्या एक्साईड कंपनीच्या २४ नग बॅटर्या अंदाजे किंमत १ लाख ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच यापूर्वी सदर गुन्ह्याचे तपासात राष्ट्रपाल दयाराम सदार (२९) व युवराज मोहन सदार दोन्ही रा. चतारी या आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेले पांढर्या रंगाचे चारचाकी सॅन्ट्रो वाहन क्रमांक एमएच १४ एक्स ०१२७ आणि चोरी केलेल्या बॅटर्यापैकी ६५ एएचच्या एक्साईड ४ नग बॅटर्या अंदाजे किंमत २८ हजार रूपये असा एकूण १ लाख ७८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या (Akola Crime) गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत भगवान विश्वनाथ सदार (३९), राष्ट्रपाल दयाराम सदार (२९) तसेच युवराज मोहन सदार तिन्ही रा. चतारी या आरोपींना अटक केली आहे.
यांनी केली कामगिरी
ही (Akola Crime) कारवाई पोलिस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, शहर पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनोज केदारे, पोलिस अंमलदार नीलेश खंडारे, अमित दुबे, अभिमन्यू सदांशिव यांनी केली.