सिन्नर विधासभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सर्वपक्षीय नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून त्यांनी तुफान फटकेबाजी केली
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा आमदार झालो नाही? मला भाजप पक्ष लकी नव्हता, असं वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. सिन्नर विधासभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सर्वपक्षीय नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून त्यांनी तुफान फटकेबाजी केली. ‘त्यावेळी काँग्रेस पक्ष इतका मोठा होत की, फक्त आधी काँग्रेसचे तिकीट घेऊन यायचं की मंत्री आमदार व्हायचे, आताही तसेच चाललं आहे भाजपमध्ये… भाजपात गेले अन् तिकीट मिळाले की आमदार होतो, मीच कसा आमदार झालो नाही? मलाच माहिती नाही. सगळीकडे निवडून आलो आणि नेमकं भाजपमध्येच हारलो… मला तो पक्ष लकी नव्हता’, असे माणिकराव कोकाटे म्हणाले. तर यावर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘तर आपण राज्याचे मंत्री झाला नसतात. भाजपने सरकार बनवायला पुढाकार घेतला. म्हणून तुम्ही मंत्री झाले. त्यामुळे भाजपच्या पायगुणामुळे मंत्री झालात. याची जाणीव आणि भान माणिकराव कोकोटे यांनी ठेवावं.’, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
Published on: Feb 02, 2025 05:33 PM