शिवर (Shivar Crime) : एमआयडीसी पोलिस स्टेशनांतर्गत येणार्या एमआयडीसीमध्ये ३१ जानेवारीच्या पहाटे अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेली तीन दुकाने चोरट्यांनी फोडली असून, लाखो रुपयांचा माल व नगदी रक्कम या चोरट्यांनी पळविली आहे. याबाबत सदरहू दुकानदारांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
याबाबतची माहिती मिळताच (Shivar Crime) एमआयडीसी पोलिस स्टेशनची चमू याठिकाणी दाखल झाली. त्यांनी परिसरातील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या शिवणी, शिवर, कुंभारी गावात गोधन चोरणार्या तसेच स्प्रिंक्लरचे नोझल चोरणार्या टोळींनी हैदोस घातला आहे. या टोळीचा अद्याप सुगावा न लागल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या गंभीर बाबींची दखल एमआयडीसी पोलिस प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी एमआयडीसीमधील कारखानेदार, दुकानदार तसेच गावातील नागरिक यांनी केली आहे.
एमआयडीसीमधील (Shivar Crime) काही भाग बार्शिटाकळी पोलिस स्टेशनांतर्गत येतो तर काही भाग खदान पोलिस स्टेशनांतर्गत येतो. त्यामुळे एमआयडीसीमध्ये एखादी चोरीची घटना झाल्यास कारखानदारांना तक्रार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे एमआयडीसीची संपूर्ण हद्द एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये समाविष्ट करण्यात यावी. तसेच या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी. अशी मागणी अनेक वेळा निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांना अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.
– नितीन बियाणी, सचिव अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन
कुंभारी, सिसा, मासा, डोंगरगाव परीसरात गोधन तसेच स्पिंकलरचे पितळी नोझल तसेच गोधन व पाळीव जनावरे चोरणार्या टोळींनी टोळींनी प्रचंड हैदोस घातला आहे. दिवसाढवळ्या हि टोळी गावातील शेतकर्यांच्या शेतीमधील स्पिंकलरच्या पितळी नोझल व पाळीव प्राणी चोरुन नेत आहेत. यासंदर्भात अनेक शेतकर्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. अद्याप याचा तपास (Shivar Crime) पोलीस प्रशासनाने केलेला नाही. यासंदर्भातील त्वरित दखल न घेतल्यास गावकर्यांच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
– बाळासाहेब अतकरे, माजी सरपंच, कुंभारी