घटनेची माहिती कंत्राटदाराने पोलिस ठाण्यात दिल्यानंतर चुडावा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.pudhari photo
Published on
:
02 Feb 2025, 2:10 pm
Updated on
:
02 Feb 2025, 2:10 pm
पूर्णा : तालूक्यातील गौर -आडगाव शेतशिवारात विद्यूत महावितरण पूर्णा उपविभागा अंतर्गत महावितरणशी संलग्नित शासकीय कंत्राटदाराकडून समृध्दी महामार्ग रस्ता कामासाठी एका स्टोन क्रेशरकरीता पूर्णा उपविभागातून ११ के व्ही विद्यूत खांब रोवणी व त्यावर विज वहनसाठी अल्यूमिनीयम तार जोडून काम पूर्ण करण्यात आले होते.
दरम्यान,या विद्यूत खांबावरील जोडणी केलेल्या तारेतून विज वहन सोडणेचं बाकी असताना शुक्रवार(ता. ३१) जानेवारी रोजी रात्री उशिरा गौर,आडगाव शिवारातील अडिच किमी लांब अंतरावरील विद्यूत पोलवरील तिन लाईन मधील सुमारे दहा क्विंटल तार अज्ञात चोरट्यांनी कट करुन चोरुन नेत लंपास केल्याची घटना शनिवार (ता. १) फेब्रुवारी रोजी उघडकीस आल्याची माहिती महावितरणशी संलग्नित विद्यूत कंत्राटदार संदीप गायकवाड यांनी सांगितले. यात कंत्राटदाराचे तीन लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कंत्राटदाराने पोलिस ठाण्यात दिल्यानंतर चुडावा पोलिसांनी रविवार (ता.२ ) फेब्रुवारी रोजी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
चुडावा -रुपला शिवारातही झाली होती अल्यूमिनीयम तारेची चोरी
दरम्यान,या आधी पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुडावा,रुपला पांढरी शिवारात देखील महावितरण कंपनीच्या एका गुत्तेदाराचे विद्यूत खांबावरील विद्यूतवाहीनी अल्युमिनियम तारेची चोरी झाली होती.आता ही दुसरी घटना असून विद्यूत खांबावरील तारेची चोरी करणारी एखादी सराईत गुन्हेगाराची टोळी सक्रिय असावी? असा कयास शेतकरी नागरीकातून व्यक्त केला जात असून चोरट्यास संबंधित पोलिसांनी तात्काळ पकडून जेरबंद करणे गरजेचे आहे.जेणेकरुन तारेची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होईल.असी मागणी सबंधीत गुत्तेदाराकडून पुढे येत आहे.