शेतकर्यांची केली थट्टा!
परभणी (Parbhani) : खरीप हंगाम 2023 मध्ये. तूर व सोयाबीन या पिकांचे सर्वात जास्त उत्पादन घेणार्या शेतकर्यां करिता पीक स्पर्धा घेण्यात आली. कृषी विभागाने थेट शेतकर्यांच्या (Farmers) बांधावर जात त्यांना झालेल्या उत्पन्नाची पाहणी करत निकाल लावला.व स्पर्धेचे निकालही दोन वर्षाखालीच जाहीर झाले. मात्र दोन वर्षे उलटूनही संबंधित विजेत्या शेतकर्यांना त्यांची मिळालेली बक्षिसाची रक्कम व प्रमाणपत्र ही मिळाले नसल्याने कृषी विभागाने (Department of Agriculture) शेतकर्यांची थट्टा केली काय. असा सवाल शेतकर्यांतून उपस्थित होत आहे.
शेतकर्यांतून तीव्र नाराजी व्यक्त…!
येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून खरीप हंगाम 2023 यावर्षीकरिता तूर व सोयाबीन या पिकाकरिता पीक स्पर्धा (Crop Competition) घेण्यात आली होती. या स्पर्धेचे निकाल ही जाहीर झाले होते. यात तुरीचे अधिक उत्पादन घेणार्या जिंतूर तालुक्यातील तीन शेतकर्यांचा समावेश होता तसेच सोयाबीन मधील अधिक उत्पन्न घेणार्या परभणीतील तीन शेतकर्यांचा समावेश होता. या शेतकर्यांत परभणी तालुक्यातील पेडगाव व मुरुंबा तसेच पूर्णा तालुक्यातील दस्तापुर या गावातील प्रत्येकी एक शेतकर्यांचा समावेश होता. निधी असतानाही बक्षिसाचे वितरण कृषी विभागाने का केला नाही. यामुळे शेतकर्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अशी मिळणार होती बक्षीसाची रक्कम!
यात अनुक्रमे पहिल्या विजेत्यास 10 हजार व प्रशस्तीपत्र, दुसर्या विजेत्यास 7 हजार व प्रशस्तीपत्र तसेच तिसर्या विजेत्या 5 हजार व प्रशस्तीपत्र अशी बक्षिसाची रक्कम होती. मात्र तब्बल दोन वर्षे उलटूनही कृषी विभागाला सदरील शेतकर्यांना बक्षीस द्यायला वेळ का मिळाला नाही. हा सवाल संतप्त शेतकर्यांकडून होत आहे.
अद्यापही लाभ मिळाला नाही…
दोन वर्षांपूर्वी सन, 2023 मध्ये खरीप पिक स्पर्धेमध्ये माझा नंबर आला होता. मात्र अद्यापही दोन वर्षे उलटूनही मला स्पर्धेतील बक्षिसाचा लाभ मिळाला नाही. इतर जिल्ह्यात मात्र बक्षीसांचे वाटपही झाले आहे.
पीक स्पर्धा विजेता शेतकरी…
पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकर्यांचे पैसे देणे बाकी आहेत. या संदर्भात माहिती नाहीये. तालुका कृषी अधिकार्यांना (Agriculture Officer) याबाबत माहिती असेल.
– दौलत चव्हाण, प्रभारी, जिल्हा कृषी अधीक्षक, परभणी.
कृषी विभागात निधी पडून आहे. कृषी विभागाकडे वाटपाला वेळ नाही. स्पर्धेतील विजेते दोन वर्षापासून बक्षिसाच्या प्रतिक्षेत आहेत. एक प्रकारे शेतकर्यांची थट्टा करण्यात आली आहे.
26 जानेवारी, 15 ऑगस्टला सन्मानीत करणे अपेक्षित!
कृषी विभागाने घेतलेल्या शेतकर्यांच्या पीक स्पर्धेतील विजेत्यांना 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा जिल्हाधिकार्यांच्या (District Collector) हस्ते विजेत्या शेतकर्यांना बक्षीस देऊन सन्मानित करणे अपेक्षित असतानाही कृषी विभागाने मात्र याची साधी तसदीही घेतली नसल्याचे पहावयास मिळत आहे.