Railway preservation waiting ticket: रेल्वेचे आरक्षित तिकीट तुम्ही जेव्हा काढतात, तेव्हा त्यात काही कोड दिलेला असतात. हे कोड खूप महत्वाचे असतात. त्यातून तुम्हाला हे तिकीट कन्फर्म होण्याचा चॉन्स किती आहे? त्यांचा अंदाज येतो. परंतु या कोडचा अर्थ हा नाही की तुमची वेटींग तिकीट कन्फर्म होणारच आहे.
भारतीय रेल्वेने दररोज कोट्यवधी लोक प्रवास करीत असतात, म्हणून रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हणजेच जीवनरेखा देखील म्हटले जाते. चला जाणून घेऊया भारतात किती प्रकारच्या ट्रेन आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत.
Indian Railway Ticket: भारतीय रेल्वे प्रवासाचे सर्वोत्तम साधन आहे. त्यामुळे रोज कोट्यवधी लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणारे अनेक जण आरक्षण करण्यास प्राधान्य देतात. परंतु सुट्या आणि सणांचा कालावधीत आरक्षण खूप लवकर फुल्ल होते. त्यामुळे रेल्वेचे वेटींग तिकीट काढावे लागते. परंतु रेल्वेचे हे तिकीट कन्फर्म होणार की नाही? त्याची माहिती नसते. रेल्वेचे चार्ट लागल्यावरच ते समजते. परंतु रेल्वेच्या तिकिटांमध्ये काही कोड असतात. त्या कोडची माहिती तुम्हाला झाली तर रेल्वेचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? ते तुम्हाला समजू शकते.
रेल्वेचे आरक्षित तिकीट तुम्ही जेव्हा काढतात, तेव्हा त्यात काही कोड दिलेला असतात. हे कोड खूप महत्वाचे असतात. त्यातून तुम्हाला हे तिकीट कन्फर्म होण्याचा चॉन्स किती आहे? त्यांचा अंदाज येतो. परंतु या कोडचा अर्थ हा नाही की तुमची वेटींग तिकीट कन्फर्म होणारच आहे. फक्त तिकीट कन्फर्म होण्याच्या संधी जास्त असल्याचे समजू शकते.
काय आहे ते कोड
- जर तुमच्या रेल्वेच्या वेटींग तिकिटावर RLWL लिहिले आहे तर त्याचा अर्थ ‘रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट’ असा होतो. RLWL कोड असणारे वेटिंग टिकट कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी असते.
- तुम्ही काढलेल्या रेल्वेच्या आरक्षित तिकिटावर PQWL लिहिले असेल तर त्याचा अर्थ ‘पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट’, असा होतो. हा कोड असणारा वेटिंग तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी असते.
- तुमच्या आरक्षित तिकिटावर GNWL लिहिले असेल तर त्याचा अर्थ ‘जनरल वेटिंग लिस्ट’, असा होता. हे तिकीट कन्फर्म होण्याची संधी अधिक असते.
- तुम्ही तत्काळ तिकीट काढले असले आणि तुमचे तिकीट कन्फर्म नसेल तर तुमच्या तिकिटावर TQWL असा कोड येतो. त्याचा अर्थ ‘तत्काल कोटा वेटिंग लिस्ट’ आहे. हे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता जवळपास नसतेच. कारण तत्काळ तिकीट लोकांनी 24 तासांपूर्वी काढलेले असते. त्यासाठी जादा रक्कम दिलेली असते. त्यामुळे त्याचा प्रवास रद्द होण्याची शक्यता जवळपास नसतेच. त्यामुळे TQWL तिकीट 99 टक्के कन्फर्म होत नाही.
- RAC म्हणजे Reservation Against Cancelation असा अर्थ आहे. यामध्ये दोन जणांना मिळून एका बर्थवर प्रवास करता येतो.
- CNF (Confirm) म्हणजे तुमचे तिकीट कन्फर्म झाले आहे. तुम्हाला जर बर्थ अलॉटमेंट झाले नसेल तर चार्ट बनल्यानंतर अलर्ट होणार असणार आहे.
- CAN (Cancel) म्हणजे तिकीट रद्द करणे आहे. प्रवाशाने हे तिकीट रद्द केले आहे.