राधाकृष्ण विखे-पाटीलpudhari
Published on
:
02 Feb 2025, 9:30 am
Updated on
:
02 Feb 2025, 9:30 am
नगर: विधानसभेच्या निकालाबाबत एखाद्या संस्थेवर संशय घेणे म्हणजे मतदारांचा अवमान करण्यासारखे आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आठवेळा विजयी होणारे कशामुळे पराभूत झाले यासाठी मतदारांचे मत जाणून घ्यावे, असा सल्ला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना दिला आहे.
जनतेची गैरसोय लक्षात घेऊन, महसूल मंडळांची पुनर्रचना केली जाणार आहे. पुनर्रचनेनंतरच आश्वी बुद्रूक येथील अपर तहसील कार्यालयास मंजुरी दिली जाईल, असे विखे पाटील यांनी म्हटले.आयोगासारख्या संस्थेबाबत संशय व्यक्त करणे म्हणजे मतदारांचा अवमान करण्यासारखे आहे. त्यांचा पराभव का झाला हे तेथील मतदारांकडून जाणून घ्यावे, असे विखे पाटील म्हणाले.
तालुक्याचे विभाजन करुन त्यांचे ‘स्वातंत्र्य’ हिरावून घेणार नाही, असा टोला देखील त्यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना लगावला. हरेगाव येथे एका परकीय कंपनी सतराशे कोटींचा प्रकल्प उभारणार आहे. त्यासाठी कंपनीने दोन हजार एकर जमीन मागितली आहे.
अहिल्यादेवींचे चारशे कोटींचे स्मारक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांचे 400 कोटी रुपये खर्चाचे उच्च दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय 300 अंगणवाड्यांचे बांधकाम, 300 जलस्रोतातील गाळ काढणे, 300 गावे अतिक्रमणमुक्त करणे, पुरातन बारवांची दुरुस्ती, कन्या विद्यालयांत सीसीटिव्ही बसविणे आदी कामे करण्यात येणार आहेत.