अभिनेत्री शमिता शेट्टी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण तर केलं. पण बहीण आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्याप्रमाणे शमिताला इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. शमिताने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्रीला यश मिळालं नाही. शमिता शेट्टी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, मुंबईतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेत्रीने फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शमिता हिने बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याच्यासोबत देखील काम केलं. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी शमिताने ‘मोहब्बतें’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
शमिताच्या करीयरची सुरुवात चांगली झाली. त्यानंतर अभिनेत्रीचे सर्व सिनेमे फ्लॉप होऊ लागले… फ्लॉप करीयरनंतर शमिता हिला ‘बिग बॉस’ मध्ये देखील पाहण्यात आलं. बिग बॉसच्या दिवसांमध्ये शमिताच्या सर्वत्र चर्चा रंगल्या. राकेश बापट याच्यासोबत शमिताच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला. ‘बिग बॉस’ नंतर देखील दोघांना अनेकदा स्पॉट करण्यात आलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.
‘बिग बॉस’ नंतर शमिता आता फक्त सोशल मीडियावर सक्रिय असते. सांगायचं झालं तर, इंडस्ट्रीपासून दूर असली तरी शमिका कोट्यवधींची मालकीण आहे. शमिता हिच्याकडे जवळपास 35 कोटी रुपयांची संपत्ती आहे. जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शमिता कोट्यवधींची कमाई करते. शमिका फॅशन डिझायनर देखील आहे.
शमिता शेट्टीचं खासगी आयुष्य
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टी हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याही सेलिब्रिटीसोबत शमिताचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. आज वयाच्या 44 व्या वर्षी सर्वकाही असून देखील अभिनेत्री एकटं आयुष्य जगत आहे.
शमिता शेट्टी आता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.