Manoj Jarange onslaught connected Namdev Shashtri : मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेले वक्तव्य त्यांचाच अंगलट येण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यांच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे.
नामदेव शास्त्रींवर टीकेची झोड
मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याचा पुळका आल्याने ते वादात सापडले आहेत. खंडणीखोर मारेकऱ्यांची कड घेतल्याने त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. आध्यात्मिक क्षेत्रात उच्च पदावरील महाराजांच्या वायफळ बडबडीने संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा महाराजांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संतोष देशमुख यांचे कुटुंब गडावर पोहचत असतानाच त्यांनी महंतावर तोफ डागली आहे.
बातमी अपडेट होत आहे…