राज्य कुस्तीगीर संघ उपाध्यक्षपदी आ. संग्राम जगतापPudhari
Published on
:
02 Feb 2025, 8:40 am
Updated on
:
02 Feb 2025, 8:40 am
नगर: राज्य कुस्तीगीर संघाच्या उपाध्यक्षपदी आ. संग्राम जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. राज्य कुस्तीगीर संघाच्या शनिवारी (दि. 1) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. संघाचे राज्याध्यक्ष माजी खा. रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. त्यात आ. जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी राज्य कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, उपाध्यक्ष प्रा. पै. विलास कथुरे, पै. हनुमंत गावडे, महाराष्ट्र केसरी पै. बापू लोखंडे, जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्रा. डॉ. पै. संतोष भुजबळ आदींसह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
आ. जगताप यांच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्तीचा ठराव राज्य उपाध्यक्ष संदीप भोंडवे यांनी मांडला त्यास उपाध्यक्ष विलास कथुरे यांनी अनुमोदन दिले. या वेळी नवनियुक्त राज्य उपाध्यक्ष आ. संग्राम जगताप यांचा राज्याध्यक्ष रामदास तडस यांनी सत्कार करून अभिनंदन केले.
निवडीनंतर आ. जगताप म्हणाले की, राज्यामध्ये कुस्तीचा नावलौकिक वाढवण्यासाठी, तसेच या क्षेत्रामध्ये नवीन पिढीला आणण्यासाठी पदाच्या माध्यमातून काम करणार आहे, असे सांगून आभार मानले.