अर्थसंकल्प- २०२५ मध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घोषणा केली आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बजेटमध्ये ४००४.३१ कोटीची तरतूद केलेली आहे. जपानच्या मदतीने तयार होणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन साल २०१५ मध्ये करण्यात आले होते. परंतू दहा वर्षे झाली तरी बुलेट ट्रेन अजूनपर्यंत धावलेली नाही.याच काळात जगभरातील हायस्पी़ड ट्रेनच्या नेटवर्कमध्ये दुप्पटीने वाढ झालेली असल्याचे आकडेवारी सांगत आहे.
मुंबई आणि अहमदाबाद या मार्गावर ५०८ किमी लांबीचा हायस्पीड रेल कॉरीडॉर उभारला जात आहे. हा मार्ग ( महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा- नगर हवेली)दोन राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातून जात आहे. या संपूर्ण मार्गावर १२ स्थानके आहेत. या बुलेट ट्रेनचा वेग दर ताशी ३२० किमी इतका असणार आहे. दुसरीकडे जगभरात या साल २०१५ ते २०२२ दरम्यान हायस्पीड रेल्वेचे नेटवर्क दुप्पटीने वाढले आहे. साल २०१३ मध्ये जगभरात हायस्पीड रेल्वेचे नेटवर्क २७,२२७ किमीचे होते आणि साल २०२२ मध्ये त्यात वाढ होऊन ते ५९,४२१ किमी लांबीचे झाले आहे.
चीनची आघाडी
सर्वात मोठे हायस्पीड रेल्वेचे नेटवर्क असलेला चीन या टेक्नॉलॉजीत सर्वात आघाडीवर आहे. चीनमध्ये बिजींग आणि शांघाय दरम्यान १,३१८ किमी लांबीचा हायस्पीड रेल्वे नेटवर्क आहे. या मार्गावर दर ताशी ३०० किमी वेगाने ट्रेन धावत असते आणि ४ तास १ ८ मिनिटांत हा प्रवास पूर्ण करते. हे अंतर मुंबई ते दिल्ली इतके आहे.
जपानचा नंबर
जगात सर्वात मोठे हायस्पीड ट्रेनचे नेटवर्क असल्याच्या बाबतीत चीन नंतर जपानचा नंबर लागतो. टोकीयो आणि ओसाका या दरम्यान ४९९ किमी लांबीचा हायस्पीड रेल्वे मार्ग आहे.टोकियो आणि ओसाका दरम्यान दर ताशी २२० किमी वेगाने ट्रेन धावत असते. ही बुलेट ट्रेन ३०० किमी प्रति तास वेगाने चालण्याच्या क्षमतेची आहे.
रोम आणि मिलान
त्यानंतर इटलीतील रोम आणि मिलान येथे ४७८ किमी लांबीचे हायस्पीड रेल्वे नेटवर्क आहे. येथे दर ताशी १५० किमी वेगाने ट्रेन धावते.ब्रिटनमध्ये देखील हायस्पीड ट्रेन आहे. येथे लंडन आणि पॅरिस दरम्यान हायस्पीड ट्रेन धावते. ही ट्रेन ३४२ किमी लांबीचा प्रवास सुमारे १५० किमी प्रतितास वेगाने पूर्ण करते.
आपल्या बुलेट ट्रेनची काय स्थिती ?
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचे काम सुरु आहे.महाराष्ट्रात २१ किमीचा लांबीचा बोगद्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत ३४० किमीचा मार्ग बांधून पू्र्ण झाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकल्पांतर्गत साल २०२६ मध्ये या मार्गावर पहिली ट्रेन धावू शकणार आहे